AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिन्याभरापूर्वी कोरोनामुक्त, मेजर ध्यानचंद यांचे पुत्र बृजमोहन सिंह कालवश

कोरोनाने एकाच दिवसात भारताचे दोन ऑलिम्पिकवर हिरावल्याची बातमी दोनच दिवसांपूर्वी समोर आली होती. (Dhyan Chands son Brijmohan)

महिन्याभरापूर्वी कोरोनामुक्त, मेजर ध्यानचंद यांचे पुत्र बृजमोहन सिंह कालवश
Dhyan Chand's son Brijmohan (Pic Credit IANS)
| Updated on: May 10, 2021 | 11:59 PM
Share

मुंबई : कोरोनाने एकाच दिवसात भारताचे दोन ऑलिम्पिकवर हिरावल्याची बातमी दोनच दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यामुळे भारतीय क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यातच आता कोरोनामुळे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचे पुत्र बृजमोहन सिंह यांचे निधन झाल्याची बातमी समोर आल्याने क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. बृजमोहन हे ध्यान चंद यांच्या 7 मुलांपेकी सर्वात ज्येष्ठ होते. बृजमोहन यांच्या निधनाबाबत त्यांचे भाऊ अशोक कुमार यांनी माहिती दिली आहे. बृजमोहन 82 वर्षांचे होते, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे. (Hockey wizard Dhyan Chands eldest son Brijmohan singh passes away)

अशोर कुमार यांनी आयएएनएसला सांगितले की, “आमचा मोठा भाऊ एक महिन्यापूर्वी कोरोनातून बरा झाला होता आणि तो पूर्णपणे ठीक होता. त्याला इंग्रजी चित्रपट खूप आवडायचे. काल रात्रीसुद्धा त्याने एक इंग्रजी चित्रपट पाहिला. त्यानंतर आज सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेला आणि परत आला. घरी आल्यानंतर तो ज्यूस प्यायला. त्यानंतर तो बाथरूममध्ये गेला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला.

कोरोनाने एकाच दिवसात भारताचे दोन ऑलिम्पिकवर हिरावले

माजी भारतीय हॉकीपटू (Indian Hockey Player) आणि प्रशिक्षक एमके कौशिक (MK Kaushik) यांचं शनिवारी कोरोनामुळे निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. कौशिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक (Moscow Olympics Hockey Gold medallists) विजेत्या टीम इंडियाचे सदस्य होते. कौशिक यांना दिल्लीतील एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांनी या दरम्यान अखेरचा श्वास घेतला. कौशिक यांच्या मृत्यूमुळे हॉकीसह क्रीडाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.

कौशिक यांच्या पत्नीलाही कोरानाची बाधा झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कौशिक यांनी हॉकीसाठी अमूल्य योगदान दिलं होतं. ते 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक संघाचे सदस्य होते. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये हॉकीसाठीचे हे अखेरचे पदक ठरले. यानंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये हॉकी या खेळात पदक मिळवता आलेले नाही. कौशिक यांनी प्रशिक्षक पदाचीही जबाबदारी चोखपणे पार पाडली होती. कौशिक यांनी टीम इंडियाच्या महिला आणि पुरुष संघाला हॉकीचे धडे दिले होते. कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली 2002 मध्ये भारतीय महिला हॉकी टीमने कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण कमाई केली होती.

रवींदर पाल यांचंही निधन

दरम्यान, शनिवारी सकाळी (8 मे) माजी हॉकीपटू रविंदर पाल सिंह (Ravinder Pal Singh) यांचंही कोरोनामुळे निधन झालं. वयाच्या 65 वर्षी त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांची मागील 2 आठवड्यांपासून त्यांची कोरोना विरुद्ध झुंज सुरु होती. त्यांची ही झुंज अपयशी ठरली. शनिवारी सकाळी लखनऊ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाल देखील 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेत्या संघाचे सदस्य होते.

इतर बातम्या

IPL चा सर्व पैसा खर्च करण्याची तयारी, तरीही पित्याला वाचवण्यात अपयश, युवा क्रिकेटपटूवर दु:खाचा डोंगर

IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या मोसमातील उर्वरित सामन्यांबाबत BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचं मोठं विधान

20 व्या वर्षी पदार्पण, पहिल्या कसोटीत ठोकल्या 95 धावा, 21 वर्षी करिअर संपलं, ‘तो’ कमनशिबी क्रिकेट कोण?

(Hockey wizard Dhyan Chands eldest son Brijmohan singh passes away)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.