AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind Vs Aus | भारतीय ओपनर्स पृथ्वी आणि मयांकची एकच चूक, सुनील गावस्कर भडकले

टीम इंडियाच्या ओपनर्सला चमकदार कामगिरी करता आली नाही. दोघा ओपनर्स जोडीवर भारताचे माजी दिग्गज बॅट्समन सुनील गावस्कर भडकले.

Ind Vs Aus | भारतीय ओपनर्स पृथ्वी आणि मयांकची एकच चूक, सुनील गावस्कर भडकले
| Updated on: Dec 17, 2020 | 11:18 PM
Share

अ‌ॅडलेड : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia vs India, 1st Test) यांच्यात आजपासून (17 डिसेंबर) कसोटी मालिकेला सुरुवात झाली. या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडिया टॉस जिंकून फलंदाजीसाठी मैदानात आली. टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात राहिली. आऊट ऑफ फॉर्म असलेल्या पृथ्वी शॉने पुन्हा एकदा निराशा केली. पृथ्वी सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. मिचेल स्टार्कने त्याला बोल्ड केलं. पृथ्वीला भोपळाही फोडता आला नाही. ओपनिंगला आलेल्या मयांकलाही  कमिन्सने 17 धावांवर बोल्ड केलं. मयंकला चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्याला या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. टीम इंडियाच्या ओपनर्सला चमकदार कामगिरी करता आली नाही. दोघा ओपनर्स जोडीवर भारताचे माजी दिग्गज बॅट्समन सुनील गावस्कर भडकले. (Ind Vs Aus Sunil Gavaskar Attacked on prithvi Shaw And mayank Agrawal Doing Same mistake)

आजही आपण पाहा पृथ्वीच्या बॅटची पोझिशन काय असते. बॅट आणि पॅडच्या मध्ये खूप जास्त गॅप असतो. पृथ्वी आऊट झाला तो मॅचचा दुसराच बॉल होता आणि त्यावेळी पृथ्वी हलक्या हाताने खेळत होता?, काय बोलावं आता… जितकं लेट खेळता येईल तितकं तो लेट खेळतोय. लेट खेळल्याने स्विंग झालेल्या बॉलला आतमध्ये येण्याचं निमंत्रण देत असतो. अशावेळी होणार काय, बॅटच्या आतल्या बाजूस बॉल लागेल नाहीतर बॅट आणि पॅडच्यामधून बॉल स्टम्पवर आदळेल, असं गावस्कर म्हणाले.

बॅटिंग करायला आल्यानंतर काही वेळ संयमाने बॅटिंग करणं गरजेचं असतं. सुरुवातीला पॅडच्या जवळील बॉलला खेळून काढायचं असतं. नंतर मग आत्मविश्वास वाढल्यावर आपल्या पद्धतीने शॉट खेळायचे असतात. मात्र आपण खातंही उघडलेलं नाही आणि त्याचवेळी बॅटची गती कमी करुन बॅट आणि पॅडच्यामध्ये अंतर सोडत असाल तर निकाल काय येईल?, अशी उद्विग्न प्रतिक्रिया गावस्कर यांनी दिली.

जी चूक पृथ्वीने केली तीच चूक मयांक अग्रवालने केली. बॅट आणि पॅडमधला गॅप दोघांसाठीही चिंतेची बाब ठरली. दोघा भारतीय ओपनर्सनी एकच चूक केली. पुढच्या वेळी या गोष्टी पृथ्वी-मयांकने ध्यानात ठेवायला हव्यात, असं गावस्कर म्हणाले.

दरम्यान टीम इंडियाने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 6 विकेट गमावून 233 धावा केल्या. टीम इंडियाकडून कर्णधार विराट कोहलीने 74 धावा केल्या. तसेच उपकर्णधार अजिंक्य रहाणेने 42 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

संबंधित बातम्या

Prithvi Shaw | मुंबईकर पृथ्वी शॉला कशाची दृष्ट लागली ?

Australia vs India, 1st Test, Day 1 : विराटची झुंजार खेळी, पहिल्या दिवसाखेर टीम इंडियाच्या 6 बाद 233 धावा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.