AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता काही खरं नाही…बीसीसीआयची सटकली, तातडीने कारवाई होणार, तो एक निर्णय अन् सगळचं बदलणार

भारत इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाची कामगिरी अतिशय वाईटच दिसली, आता यानंतर भारतीय संघावर जोरदार कारवाई होणार आहे.

आता काही खरं नाही...बीसीसीआयची सटकली, तातडीने कारवाई होणार, तो एक निर्णय अन् सगळचं बदलणार
ind vs eng
| Updated on: Jul 10, 2026 | 2:05 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील भारतीय संघाची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली. संघाला अजून एकही सामना जिंकता आलेले नाही ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. आता याबाबत बीसीसीआय आक्रमक होणार असून एक मोठी कारवाई होण्याची ही भीती नाकारता येत नाही. आता भारतीय संघाचे केवळ इंग्लंडविरुद्धच नाही तर आयर्लंडविरुद्धही प्रदर्शन खराब पाहायला मिळाले. मागील काही काळात भारतीय संघाची टी-20 बाजू उत्तम होती प्रदर्शन अगदी तगडे होते पण आता तसे पाहायला मिळाले नाही.

इंग्लंड दौऱ्यावर सलग तीन टी-20 सामन्यांतील पराभवानंतर बीसीसीआय भारतीय संघावर कारवाई करु शकते. वृत्तानुसार, टी-20 मालिकेतील निराशाजनक कामगिरीबद्दल बीसीसीआय संघाच्या प्रशिक्षक आणि खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेऊ शकते. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा करार 2027 पर्यंत आहे, परंतु बीसीसीआयच्या सूत्रांनुसार संघाच्या अलीकडील कामगिरीमुळे त्यांची नोकरी धोक्यात आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग दोन टी-20 मालिका गमावल्या आहेत. भारतीय संघ आयर्लंडकडून 2-0 ने पराभूत झाला होता आणि आता इंग्लंडने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत चार सामने खेळले गेले असून, मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

इंग्लंड दौऱ्यादरम्यान अनेक व्यवस्थापकीय निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे बीसीसीआय भारतीय संघाच्या कामगिरीचा आढावा घेणार असल्याची अफवा पसरत आहे. विशेषतः, संजू सॅमसनला संघातून वगळल्याबद्दल संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यानंतर संजू सॅमसनला संघातून वगळण्यात आले. त्याच्या जागी सलामीवीर म्हणून वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली, पण तो प्रभावी ठरलेला नाही. दुसरीकडे, ईशान किशन आणि तिलक वर्मा यांचा फॉर्मसुद्धा भारतीय संघासाठी डोकेदुखी बनला आहे. आयर्लंड मालिकेसह या संपूर्ण दौऱ्यात तिलक वर्मा फलंदाजीत अपयशी ठरलेला दिसत आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा