AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : बॉल पकडताना रिषभ पंत का पडतो? विराटच्या चेहऱ्यावर प्रश्न, रिषभचं उत्तर पहा

टीम इंडियाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत जेव्हा जेव्हा जेव्हा मैदानात येतो तेव्हा तो चर्चेत असतो. (Rishabh Pant Flip in Ahmedabad test)

Video : बॉल पकडताना रिषभ पंत का पडतो? विराटच्या चेहऱ्यावर प्रश्न, रिषभचं उत्तर पहा
ऋषभ पंत
| Updated on: Mar 04, 2021 | 11:47 PM
Share

अहमदाबाद : टीम इंडियाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत जेव्हा जेव्हा जेव्हा मैदानात येतो तेव्हा तो चर्चेत असतो. भारत-इंग्लंड संघांमध्ये अहमदाबाद येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यानही असेच घडले. या कसोटीच्या पहिल्या दिवशी पंत विकेटच्या मागे खूप सक्रिय दिसला. त्याच्या शैलीत त्याने गोलंदाजांना प्रोत्साहन दिले. दरम्यान, वेगवान गोलंदाज इशांत शर्माचा एक बॉल पकडण्याच्या प्रयत्नात तो खाली पडला. इशांतचा फुल लेंथ बॉल फलंदाजाच्या जवळ पडला, परंतु पंतजवळ येताच तो वरच्या दिशेने उडाला, अशा परिस्थितीत पंतला हा बॉल पकडण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. अखेर चेंडू पकडताना तो खाली पडला. पण खाली पडल्यानंतर तो सामान्यांप्रमाणे उठून उभा राहिला नाही, एका जिम्नॅस्टप्रमाणे उडी मारून (Flip) करुन तो उभा राहीला. पंतचा फिटनेस पाहण्यासारखा होता. (IND vs ENG : Rishabh Pant flip infront of Virat Kohli in Ahmedabad test)

रिषभला उडी मारून उभा राहताना पाहून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीही आश्चर्यचकित झाला. तो हातांसह डोळ्यांच्या हावभावाने पंतची स्तुती करताना दिसला. त्याचवेळी यष्टिरक्षक पंतही विराटकडे पाहून हसला. इंग्लंडच्या पहिल्या डावातील सातव्या षटकात हा प्रसंग पाहायला मिळाला. पंत एका जिम्नॅस्टप्रमाणे उठून उभा राहिला, हे पाहिल्यावर कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकर आणि दीप दासगुप्तादेखील हसू लागले. दीप दासगुप्ता म्हणाला की, “हा मुलगा एक भन्नाट कॅरेक्टर आहे. गुड वन रिषभ”, त्यावर अजित आगरकर म्हणाला की, “दीप दासगुप्त त्याच्या काळातही असंच करायचा”. यावर कॉमेंट्री बॉक्समधून हसण्याचा आवाज येवू लागला. दरम्यान, इंग्लंडच्या पहिल्या डावात रिषभ पंतनेही एक स्टंप विकेट मिळवली. अक्षर पटेलच्या चेंडूवर त्याने डॅन लॉरेन्सला माघारी परतवले.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना (India vs England 4th Test) येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या फिरकीसमोर इंग्लंडने पुन्हा एकदा लोटांगण घातलं आहे. इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांवर आटोपला आहे. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 55 धावा केल्या. तर डॅनियल लॉरेन्सने 46 धावांची खेळी केली. टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी पुन्हा एकदा आपल्या फिरकीचा जलवा दाखवला. अक्षर पटेलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. आर अश्विनने 3 बळी घेत त्याला चांगली साथ दिली. सोबत मोहम्मद सिराजने 2 आणि वॉशिंग्टन सुंदरने एक विकेट घेतली.

इतर बातम्या

India vs England 4th Test, Day 1 Live Updates | टीम इंडियाची निराशजनक सुरुवात, शुबमन गिल शून्यावर बाद

Video | इम्रान ताहिरचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘खेळभावना असावी तर अशी…!’

IPL 2021 | CSK आयपीएलच्या आगामी मोसमासाठी सज्ज, ट्रेनिंग कॅंपसाठी धोनीसह युवा खेळाडू चेन्नईत

(IND vs ENG : Rishabh Pant flip infront of Virat Kohli in Ahmedabad test)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.