IND vs SA: केएल राहुलचा तोडगा आला कामी, भारताला नाणेफेक जिंकण्यास झाली मदत Watch Video
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात अखेर भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेलं शुक्लकाष्ठ अखेर संपलं असंच म्हणावं लागेल. यासाठी केएल राहुलने एक तोडगा वापरला होता. कसं काय ते जाणून घ्या

भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करावी लागली होती. त्यामुळे धावांचा पाठलाग करणं दक्षिण अफ्रिकेला सोपं झालं होतं. पण तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने अखेर नाणेफेकीचा कौल जिंकला. त्यामुळे क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला. कारण शेवटचा सामना जिंकण्यासाठी नाणेफेकीचा कौल हा खूपच महत्त्वाचा होता. यापूर्वी भारताने सलग 20 वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावला होता. 2023 च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा टॉस जिंकला होता. त्यानंतर नाणेफेक गमवण्याची मालिका सुरु होती. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ही मालिका मोडण्यात यश आलं. भारताने टॉस जिंकल्यानंतर कर्णधार केएल राहुल खूश झाला. त्याने नाणेफेकीचा कौल जिंकण्यासाठी वापरलेल्या तोडग्याची सध्या चर्चा होत आहे.
केएल राहुलने विशाखापट्टणममध्ये नाणेफेकीसाठी आला तेव्हा नाणं त्याच्या हातात होतं. पण हे नाणं उडवताना त्याने डाव्या हाताचा वापर केला. टेम्बा बावुमाने नाणं उडवताच हेड्स म्हंटलं आणि नाणं जेव्हा जमिनीवर पडलं तेव्हा टेल्स आलं. त्यामुळे केएल राहुल भलताच खूश झाला. कारण नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णायक सामन्यात मनासारखा निर्णय घेता आला. सलग 20 नाणेफेकीचे कौल गमावल्यानंतर भारताच्या पदरी कौल पडला आहे. कर्णधार केएल राहुलने क्षणाचाही विलंब न करता प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कारण दुसऱ्या डावात दव पडत असल्याने गोलंदाजांना गोलंदाजी करणं कठीण जातं.
🚨 Toss 🚨#TeamIndia have won the toss and elected to field first.
Updates ▶️ https://t.co/HM6zm9o7bm#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/vYNPSa1iKF
— BCCI (@BCCI) December 6, 2025
कर्णधार केएल राहुल म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करू. काल रात्री आपण येथे सराव केला आणि प्रशिक्षकांकडून मिळालेल्या माहितीनुसार दव पडला होता. पण रांची आणि रायपूरमध्ये ते लवकर पडले नव्हते. आमचा ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेऊन आम्ही दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करण्याचा विचार केला होता. मला वाटत नाही की रायपूर आणि रांचीसारख्या मोठ्या धावा होतील. पण, आम्हाला फक्त एकूण धावसंख्या बदलायची आहे आणि आम्ही प्रथम कशी गोलंदाजी करू शकतो ते पहायचे आहे.’ दुसरीकडे टेम्बा बावुमा म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी केली असती. चांगली सुरुवात मधल्या फळीसाठी चांगली असेल, आम्ही स्पर्धात्मक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू आणि नंतर ते वाचवू अशी आशा आहे.’
