IndvsBan Live : टीम इंडियाने करुन दाखवलं, बांगलादेशवर एक डाव, 130 धावांनी मात

टीम इंडियाने पहिल्या कसोटीत बांगलादेशचा (India beat Bangladesh in first Indore test) धुव्वा उडवला आहे. भारताने या सामन्यात एक डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला.

IndvsBan Live : टीम इंडियाने करुन दाखवलं, बांगलादेशवर एक डाव, 130 धावांनी मात

इंदूर : टीम इंडियाने पहिल्या कसोटीत बांगलादेशचा (India beat Bangladesh in first Indore test) धुव्वा उडवला आहे. भारताने या सामन्यात एक डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला. कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी विजय मिळवत भारताने (India beat Bangladesh in first Indore test) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आघाडी मिळवली. मयांक अग्रवलाचं द्विशतक हे या कसोटीचं वैशिष्ट्य ठरलं.

या कसोटीत टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा पहिला डाव भारताने 150 धावांत गुंडाळला होता. मग भारताने पहिला डाव 6 बाद 493 धावांवर घोषित करुन, बांगलादेशवर 343 धावांची आघाडी घेतली. भारताच्या वेगवान माऱ्यासमोर बांगलादेशी फलंदाज तग धरु शकले नाहीत. बांगलादेशचा दुसरा डाव 213 धावांवर आटोपला.  भारताकडून मोहम्मद शमीने 4 विकेट घेतल्या.  तर बांगलादेशकडून दुसऱ्या डावात मश्फिकूर रहीमने सर्वाधिक 64 धावा केल्या.

भारताचा पहिला डाव

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने (India vs Bangladesh test) आपला पहिला डाव 6 बाद 493 धावांवर घोषित केला. पहिल्या डावात भारताने तब्बल 343 धावांची आघाडी घेतली. कसोटीचा आज तिसरा दिवस होता. बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांत आटोपला होता. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज पुन्हा बांगलादेशी फलंदाजांना लगाम घालून त्यांचा खेळ खल्लास करतात याकडे सर्वांचं लक्ष होतं, ते भारतीय गोलंदाजांनी करुन दाखवलं.

मयांकचं द्विशतक

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा सलामीवीर मयांक अग्रवालने (Mayank Agarwal double hundred) पुन्हा एकदा झंझावाती खेळी करत द्विशतक ठोकलं. यांक अग्रवालने 303 चेंडूत द्विशतक ठोकलं. 196 धावांवर असताना मयांकने षटकार ठोकून द्विशतकाला गवसणी घातली.  मयांक अग्रवालचं हे कसोटीतील दुसरं द्विशतक आहे. यापूर्वी त्याने गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्या द्विशत ठोकलं होतं. विशाखापट्टणम कसोटीत त्याने 215 धावा केल्या होत्या. ते त्याचं पहिलंच द्विशतक होतं. अवघ्या आठव्या कसोटीत मयांक अग्रवालने दोन द्विशतक झळकावून आपली चुणूक दाखवून दिली आहे.

संबंधित बातम्या 

मयांक अग्रवालचं डेअरिंग, 196 धावांवर षटकार ठोकून द्विशतक झळकावलं! 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI