India vs Australia 2020 | शुभमन गिल की मयांक अग्रवाल, धवनसोबत सलामीला कोण उतरणार?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधील नऊ खेळाडूंची जागा जवळजवळ निश्चित आहे. फक्त एक सलामीवीर आणि वेगवान गोलंदाजांची जागा रिक्त आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:30 PM, 23 Nov 2020
India vs Australia 2020 | शुभमन गिल की मयांक अग्रवाल, धवनसोबत सलामीला कोण उतरणार?

सिडनी : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची (Team India Tour Australia 2020) सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होत आहे. या मालिकेतील पहिला सामना 27 नोव्हेंबरला खेळण्यात येणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज आहे. टीम इंडियाने कांगारुंविरुद्ध लढण्यासाठी नेट्समध्ये कसून सराव केला आहे. भारताकडून ‘गब्बर’ शिखर धवन (Shikhar Dhawan) सलामी करणार आहे. मात्र त्याला साथ कोण देणार हा प्रश्न टीम इंडियासह मॅनेजमेंटलाही सतावत आहे. टीम इंडियाकडे सलामीवीर म्हणून शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि मयंक अग्रवाल (Mayanak Agarwal)असे 2 पर्याय आहेत. या दोघांमध्ये शिखरला साथ देण्यासाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. india vs australia 2020 shubman Gill or mayank agarwal who will come with shikhar dhawan as the opener

मयंक अग्रवाल अपयशी

टीम इंडियाने अखेरची एकदिवसीय मालिका न्यूझीलंडविरुद्ध खेळली होती. त्यावेळेस टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर गेली होती. या मालिकेत यजमान न्यूझीलंडने टीम इंडियाचा वनडे सीरिजमध्ये 3-0 असा एकतर्फी पराभव केला होता. या मालिकेत मयंकला स्थान देण्यात आले होते. मात्र मयंकला या संधीचं सोनं करता आलं नाही. मंयकने या 3 सामन्यात केवळ 36 धावाच केल्या होत्या. त्यामुळे टीम मॅनेजमेंट पुन्हा मयंकवर विश्वास दाखवून सलामी करण्याची संधी देणार का, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आहे.

शुभमन गिलला संधी मिळणार?

शुभमन गिलला देखील शिखरला साथ देण्याची संधी मिळू शकते. मात्र प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली गिलवर किती विश्वास दाखवतात, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. काही दिवसांपूर्वी रवी शास्त्री यांनी शुभमन गिलसोबत चर्चा करतानाचा फोटो ट्विट केला होता.

गिल आणि मयंकची आयपीएलच्या 13 व्या मोसमातील कामगिरी

आयपीएलचा 13 वा मोसम नुकताच पार पडला. या मोसमात शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल या दोघांनी चांगली कामगिरी केली. कोलकाताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गिलने 440 तर पंजाबकडून खेळणाऱ्या मयंकने 418 धावा केल्या. त्यामुळे दोन्ही खेळाडू तुळ्यबल आहेत. यामुळे टीम मॅनेजमेटं नक्की कोणाला सलामी करण्याची संधी देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आठ खेळाडूंची जागा निश्चित

एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधील आठ खेळाडूंची जागा जवळपास निश्चित आहे. यामध्ये शिखर धवन, कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर, विकेटकीपर फलंदाज केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे.

एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

एकदिवसीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020 | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराटला सचिनचे हे 2 विक्रम मोडित काढण्याची संधी

India vs Australia 2020 | वेगवान 12 हजारी विराट, शंभर नंबरी चहल, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहली-युजवेंद्रला विक्रमाची संधी

India vs Australia 2020 | टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांडयाची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी

india vs australia 2020 shubman Gill or mayank agarwal who will come with shikhar dhawan as the opener