IndvsBan Live : भारताकडे महाआघाडी, बांगलादेशला आजच गुंडाळण्याचा निर्धार

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने (India vs Bangladesh test) आपला पहिला डाव 6 बाद 493 धावांवर घोषित केला. पहिल्या डावात भारताने तब्बल 343 धावांची आघाडी घेतली आहे.

IndvsBan Live : भारताकडे महाआघाडी, बांगलादेशला आजच गुंडाळण्याचा निर्धार

India vs Bangladesh test इंदूर : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने (India vs Bangladesh test) आपला पहिला डाव 6 बाद 493 धावांवर घोषित केला. पहिल्या डावात भारताने तब्बल 343 धावांची आघाडी घेतली आहे. कसोटीचा आज तिसरा दिवस आहे. बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांत आटोपला होता. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज पुन्हा बांगलादेशी फलंदाजांना लगाम घालून त्यांचा खेळ खल्लास करतात का हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

पहिल्या सत्राच्या सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी झोकात सुरुवात केली.   उमेश यादवने बांगलादेशचा सलामीवीर इम्रूल कायसला 6 धावांवर त्रिफळाचीत करुन माघारी धाडलं. त्यानंतर इशांत शर्मानेही सलामीवीर शादाम इस्लामची दांडी उडवून दुसरं यश मिळवून दिलं. शादाम 6 धावांवर माघारी परतला, त्यावेळी बांगलादेशची धावसंख्या 2 बाद 16 इतकी होती.

दरम्यान भारताचा सलामीवीर मयांक अग्रवालच्या धडाकेबाज द्विशतकाच्या जोरावर भारताने 500 धावांपर्यंतचा टप्पा गाठला. कसोटीचा दुसरा दिवस मयांक अग्रवालनेच गाजवला. त्याने 330 चेंडूत 243 धावांची तुफानी खेळी केली. त्याशिवाय अजिंक्य रहाणे 86, चेतेश्वर पुजारा 54 आणि रवींद्र जाडेजाने नाबाद 60 धावा ठोकल्याने, भारताने 6 बाद 493 धावांपर्यंत मजल मारली.

मयांकचं द्विशतक

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा सलामीवीर मयांक अग्रवालने (Mayank Agarwal double hundred) पुन्हा एकदा झंझावाती खेळी करत द्विशतक ठोकलं. यांक अग्रवालने 303 चेंडूत द्विशतक ठोकलं. 196 धावांवर असताना मयांकने षटकार ठोकून द्विशतकाला गवसणी घातली.  मयांक अग्रवालचं हे कसोटीतील दुसरं द्विशतक आहे. यापूर्वी त्याने गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्या द्विशत ठोकलं होतं. विशाखापट्टणम कसोटीत त्याने 215 धावा केल्या होत्या. ते त्याचं पहिलंच द्विशतक होतं. अवघ्या आठव्या कसोटीत मयांक अग्रवालने दोन द्विशतक झळकावून आपली चुणूक दाखवून दिली आहे.

संबंधित बातम्या 

मयांक अग्रवालचं डेअरिंग, 196 धावांवर षटकार ठोकून द्विशतक झळकावलं! 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *