India vs england 1st test | टीम इंडिया विरुद्ध मैदानात उतरताच इंग्लंडच्या जो रुटची ऐतिहासिक कामगिरी

जो रुट (Joe Root) इंग्लंडकडून अशी कामगिरी करणारा 15 वा खेळाडू ठरला आहे.

India vs england 1st test | टीम इंडिया विरुद्ध मैदानात उतरताच इंग्लंडच्या जो रुटची ऐतिहासिक कामगिरी
जो रुट (Joe Root)

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs england 1st test) यांच्यात चेन्नईतील एम ए चिंदबरम स्टेडियममध्ये ( M A Chidambaram) कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार असलेला जो रुटने (Joe Root) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात उतरताच त्याने हा पराक्रम केला आहे. टीम इंडिया विरोधातील हा सामना रुटच्या कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना ठरला आहे. अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा 15 वा खेळाडू ठरला आहे. रुटच्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी आयसीसीने ट्विट करत त्याचं अभिनंदन केलं आहे. (india vs england 1st test Day 1 England joe root become 15th england player who played 100 test match)

इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने इंग्लंडकडून 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळण्याची कामगिरी केली आहे. कुकने इंग्लंडकडून एकूण 161 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. तर अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसन 158 टेस्ट खेळला आहे. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनेही 144 सामन्यांमध्ये  इंग्लंडकडचे प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच या व्यतिरिक्त इंग्लंडच्या अनेख खेळाडूंनी 100 पेक्षा अधिक सामने खेळण्याची कामगिरी केली आहे.

100 कसोटी खेळणारा युवा

जो रुट सर्वात कमी वयात 100 कसोटी खेळणारा तिसरा खेळाडू आहे. अॅलिस्टर कुक सर्वात कमी वयात 100 टेस्ट मॅच खेळणारा खेळाडू ठरला. कुक 28 वर्ष 353 दिवसाचा असताना त्याने 100 वा कसोटी सामना खेळला होता. तर सचिन तेंडुलकर वयाच्या 29 वर्ष 134 दिवशी 100 कसोटी खेळण्याचा कारनामा केला होता. सचिनने 2002 मध्ये ही कामगिरी केली होती. जो रुटने 30 वर्ष 37 दिवसांचा असताना ही विशेष कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाउचरने वयाच्या 30 वर्ष 39 दिवसांचा असताना 100 वा कसोटी सामना खेळला होता.

जो रुटची कसोटी कारकिर्द

जो रुटने आतापर्यंत एकूण 99 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 19 शतक आणि 49 अर्धशतकांसह एकूण 8 हजार 249 धावा केल्या आहेत. रुटची 254 ही कसोटीतील सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे. रुटने टीम इंडिया विरोधात 2012 मध्ये भारत दौऱ्यावर असताना कसोटी पदार्पण केलं होतं. तर 100 वा सामनाही भारत दौऱ्यातच टीम इंडिया विरुद्ध खेळण्यात येत आहे. इंग्लंडच्या समर्थकांना या 100 व्या सामन्यानिमित्ताने रुटकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे. यामुळे तो कशी कामगिरी करतो, याकडे समर्थकांचं लक्ष असणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs england 1st test Day 1 LIVE : बर्न्स पाठोपाठ इंग्लंडला दुसरा धक्का, डॅनियल लॉरेन्स शून्यावर बाद

India vs england 1st Test | पहिल्या टेस्टआधीच टीम इंडियाला मोठा धक्का, फिरकीपटू दुखापतग्रस्त

(india vs england 1st test Day 1 England joe root become 15th england player who played 100 test match)

Published On - 12:15 pm, Fri, 5 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI