AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs England 4th Test | कोहलीला इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत ‘विराट’ रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी

विराट कोहलीला (Virat Kohli) इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या चौथ्या कसोटीत (India vs England 4th Test) मोठ्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.

India vs England 4th Test | कोहलीला इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत 'विराट' रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी
विराट कोहलीला (Virat Kohli) इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या चौथ्या कसोटीत (India vs England 4th Test) मोठ्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.
| Edited By: | Updated on: Mar 05, 2021 | 8:38 AM
Share

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादमध्ये कसोटी मालिकेतील चौथा (India vs England 4th Test) आणि शेवटचा सामना खेळवण्यात येत आहे. या कसोटीचा आजचा (5 मार्च) दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसखेर टीम इंडियाने 1 विकेट गमावून 24 धावा केल्या. मैदानात सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) नाबाद आहेत. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी आहे. या सामन्यात विराटने शतक लगावताच या विक्रमाची बरोबरी होईल. (india vs england 4 th test virat kohli have chance to level ricky ponting international hundreds)

काय आहे रेकॉर्ड?

विराटला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या आंतरराष्ट्रीय शतकांच्या रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय शतकांच्या बाबतीत रिकी पॉन्टिंगच्या नावे एकूण 71 शतकांची नोंद आहे. तर विराटने एकूण 70 आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं आहेत. यामुळे विराटने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत शतक झळकावल्यास तो या विक्रमाची बरोबरी साधू शकेल.

विराटची 15 महिन्यांपासून शतकाची पाटी कोरीच

विराट सक्रिय खेळाडूंपैकी सर्वाधिक शतक लगावणारा फलंदाज आहे. विराटच्या नावावर एकूण 70 शतकांची नोंद आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून विराट शतक लगावण्यात अपयशी ठरतोय. 15 महिन्यांपासून विराटची शतकाची पाटी कोरीच आहे. विराटने अखेरचं आंतरराष्ट्रीय शतक हे 22नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावलं होतं. त्यामुळे शतक न लगावणं विराट आणि त्याच्या समर्थकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे विराटला या सामन्यात शतकासह पॉन्टिंगच्या विक्रमाची बरोबरी करण्याची नामी संधी आहे.

चौथ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ

इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडची फार चांगली सुरुवात राहिली नाही. पाहुण्या फलंदाजांनी तिसऱ्या कसोटीसारखंच भारतीय गोलंदाजांसमोर पाचारण केलं. बेन स्टोक्सने इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही फार यश आले नाही. इंग्लंडकडून स्टोक्सने सर्वाधिक 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर डॅनियल लॉरेन्सने 46 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला टीम इंडियाच्या बोलर्सनी मैदानात टिकू दिले नाही.

भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला पहिल्या डावात 205 धावांवर गुंडाळलं. फिरकीपटू अक्षर पटेलने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. आर अश्विनने 3 बळी घेतल्या. तर मोहम्मद सिराजनेही 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

त्यानंतर टीम इंडिया मैदानात आली. भारताची खराब सुरुवात झाली. डावातील तिसऱ्याच चेंडूवर युवा सलामीवीर शुबमन गिल शून्यावर बाद झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. रोहित आणि पुजाराने डाव सावरला. दिवसाचा खेळ संपण्यासाठी अवघ्या काही ओव्हर्स बाकी होत्या. या जोडीने सावध खेळ करत विकेट गमावली नाही. दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित 8 तर पुजारा 15 धावांवर नाबाद होते.

संबंधित बातम्या :

India vs England 4th Test, Day 1 Highlights | पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व, दिवसखेर 1 बाद 24 धावा

(india vs england 4 th test virat kohli have chance to level ricky ponting international hundreds)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.