Smriti Mandhana Wedding Called Off : क्रिकेटर स्मृती मानधना हिचा धक्कादायक निर्णय, थेट पलाश मुच्छलसोबतचे लग्न…
संगीतकार पलाश मुच्छल आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना यांचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 रोजी सांगलीत होणारे होते. मात्र, वडिलांची तब्येत खराब झाल्याने लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे सांहितले गेले.

संगीतकार पलाश मुच्छल आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना यांचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 रोजी सांगलीत होणारे होते. मात्र, वडिलांची तब्येत खराब झाल्याने लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले गेले. आता तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत थेट लग्न रद्द केल्याचे जाहिर केले. सुरूवातीला हे लग्न तिच्या वडिलांच्या तब्येतीमुळे पुढे ढकलल्याचे सांगितले गेले. त्यानंतर पलाश मुच्छल याचे काही धक्कादायक स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यावरून कळत होते की, पलाश स्मृती मानधना हिला धोका देत आहे. त्यामुळेच तिने पलाशसोबत लग्न पुढे ढकलले. आता थेट स्मृती मानधना हिने पोस्ट शेअर करत लग्न रद्द केल्याचे जाहीर करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.
स्मृतीने पोस्टमध्ये काय म्हटलंय?
गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबद्दल बरीच चर्चा आणि तर्क-वितर्क सुरू आहेत, आणि मला वाटते की आता या विषयी बोलणे आवश्यक आहे. मी खूप खाजगी स्वभावाची व्यक्ती आहे आणि तसेच राहू इच्छिते, पण मला हे स्पष्ट करणे गरजेचे आहे की लग्न रद्द करण्यात आले आहे.
मी ही बाब इथेच संपवू इच्छिते आणि आपण सर्वांनीही तसेच करावे, अशी विनंती करते. कृपया दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि आम्हाला आमच्या पद्धतीने, आमच्या वेगाने हे सगळं सामावून घेण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी आवश्यक तेवढी जागा द्या. मला विश्वास आहे की आपण सर्वांना चालवणारी एक उच्च शक्ती असते आणि माझ्यासाठी ती शक्ती नेहमीच माझ्या देशाचे सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व करणे आहे.

Smriti Mandhana post
भारतासाठी खेळत राहणे, आणि शक्य तितकी विजेतेपदे मिळवणे—हेच माझे ध्येय कायम राहील. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे.” असे तिने स्पष्ट म्हटले. स्मृती मानधना हिने पलाश मुच्छलसोबतचे लग्न रद्द केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पलाश मुच्छल हा तिला धोका देत असल्याचे सांगितले जाते. आता आपल्या खेळावर पुन्हा एकदा स्मृती मानधना लक्ष केंद्रीत करत आहे.
