कोरोनाकाळात घोडेसवारी, रवींद्र जाडेजा म्हणतो, ‘मी आता पूर्णपणे सुरक्षित…!’

आयपीएल स्थगित झाल्यानंतर रवींद्र जाडेजा गुजरातमधील जामनगरच्या आपल्या घरी पोहोचलाय. कोरोना व्हायरसच्या भीषण परिस्थितीत त्याच्या छंदांना जोपासण्याचं काम तो सध्या करतोय. (Indian Team Allrounder Ravidra jadeja Share Picture With Horses)

कोरोनाकाळात घोडेसवारी, रवींद्र जाडेजा म्हणतो, 'मी आता पूर्णपणे सुरक्षित...!'
रवींद्र जाडेजाने घोड्यांसोबतचे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलंय, "मी त्या जागी पुन्हा आलोय, ज्या जागी मी स्वत:ला सुरक्षित मानतो....."

मुंबई : कोरोनाची सगळ्या जगावर वक्रदृष्टी आहे. भारतातही कोरोनाचे दरदिवशी 3 ते 4 लाख कोरोनाबाधित मिळत आहे तर हजारो जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत. कोरोनाने क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री केल्याने आयपीएलचं 14 वं पर्व (IPL 2021) तूर्तास स्थगित करण्यात आलंय. त्यामुळे विविध संघाचे खेळाडू आपापल्या घरी गेलेत. चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने (Ravidra Jadeja) काही सोशल फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यातून कोरोनाकाळात त्याचं एकटेपण तो कसा दूर सारतोय, हे कळतं. तसंच कोरोनाकाळात घोडेसवारी करुन मी स्वत:ला अतिशय सुरक्षित मानतोय, असं जाडेजाने म्हटलंय. (Indian Team Allrounder Ravidra Jadeja Share Picture With Horses)

जाडेजा घरी पोहोचला

आयपीएल स्थगित झाल्यानंतर रवींद्र जाडेजा गुजरातमधील जामनगरच्या आपल्या घरी पोहोचलाय. कोरोना व्हायरसच्या भीषण परिस्थितीत त्याच्या छंदांना जोपासण्याचं काम तो सध्या करतोय. तो आपल्या तब्येल्यात असलेल्या घोड्यांसोबत वेळ घालवतोय. असं करत असताना कोरोनाकाळातला नकारात्कपणा बाजूला राहत असल्याचं जाडेजा म्हणतो.

जाडेजाकडून सोशल मीडियावर खास फोटो शेअर

रवींद्रा जाडेजाने सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत. घोड्यांसोबतचे फोटो शेअर करताना तो कॅप्शनमध्ये म्हणतो, “मी त्या जागी पुन्हा आलोय, ज्या जागी मी स्वत:ला सुरक्षित मानतो…..”

रवींद्र जाडेजाचा हा महाराजा स्टाईल अंदाज लोकांना भावला आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याच्या अंदाजाची तारीफ केली आहे. जवळपास 8 लाख लोकांनी त्याचे फोटो लाईक्स केले आहेत तर हजारो लोकांनी त्याच्या फोटोवर कमेंट केल्या आहेत.

जाडेजासाठी आयपीएलचं 14 वं पर्व खूप खास

आयपीएलच्या 14 व्या पर्वात रवींद्र जाडेजाने कहर केला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणा अशा तिन्ही प्लॅटफॉर्मवर त्याने आपला दलवा दाखवला. बंगळुरुविरुद्ध खेळताना त्याने पर्पल कॅप होल्डर असलेल्या हर्षल पटेलच्या एकाच षटकात 36 धावा झोडल्या. हर्षलच्या एकाच षटकात त्याने 5 षटकार मारले. तर त्याच सामन्यात बंगळुरुच्या तीन फलंदाजांना त्याने तंबूचा रस्ता दाखवला.

(Indian Team Allrounder Ravidra jadeja Share Picture With Horses)

हे ही वाचा :

क्रिकेट विश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला, 36 वर्षीय विवेक यादवचं कोरोनाने निधन

भारताचं प्रेम पाहून इंग्लंडचा खेळाडू हरखून गेला, म्हणतो, ‘भारत असा देश….’

‘ओ हसीना बडी सुंदर सुंदर’, बायकोच्या वाढदिवशी जसप्रीतकडून रोमँटिक फोटो शेअर करत खास मेसेज!

Published On - 8:30 am, Fri, 7 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI