IPL 2020 | चेन्नईचा स्टार खेळाडू शेन वॉटसनची आयपीएलमधून निवृत्ती

शेन वॉटसनने आयपीएल 2018 च्या अंतिम सामन्यात शतकी कामगिरी करत चेन्नईला विजेतेपद मिळवून दिलं होतं.

IPL 2020 | चेन्नईचा स्टार खेळाडू शेन वॉटसनची आयपीएलमधून निवृत्ती
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 6:28 PM

दुबई : चेन्नई सुपर किंग्जसचा (Chennai Super Kings) अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने (Shane Watson) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. शेन वॉटसनने निवृत्तीची माहिती चेन्नईच्या सहकाऱ्यांना सांगितली असल्याची माहिती मिळते आहे. मात्र याबाबत वॉटसनने कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही. चेन्नईने आयपीएलच्या 13 व्या मोसमातील शेवटचा सामना रविवारी 1 नोव्हेंबरला पंजाबविरुद्ध खेळला. या सामन्यात चेन्नईने पंजाबवर 9 विकेट्सने मात केली. “शेवटच्या सामन्यानंतर वॉटसन ड्रेसिंगरुममध्ये भावूक झालेला पाहायला मिळाला. भावूक होत क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती वॉटसनने आपल्या सहकाऱ्यांना दिली”. याबाबतचे वृत्त टीओआयने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार, शेन वॉटसन आता टीम मॅनेजमेंटमध्ये आपली भूमिका पार पाडताना दिसू शकतो. IPL 2020 Chennai Super Kings All Rounder Shane Watson announced his retirement from all forms of cricket

वॉटसनची आयपीएल कारकिर्द

शेन वॉटसनने आयपीएलमध्ये एकूण 145 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 137.91 च्या स्ट्राईक रेटने आणि 30. 99 च्या सरासरीने 2 हजार 809 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 शतक आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 117 ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. तसेच बोलिंग करताना वॉटसनने 145 सामन्यात 92 विकेट्स घेतल्या आहेत. 29 धावा देऊन 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्त कामगिरी आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020 : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील चेन्नईचे आव्हान संपुष्टात, धोनीच्या नावे खराब विक्रमाची नोंद

IPL 2020 Chennai Super Kings All Rounder Shane Watson announced his retirement from all forms of cricket

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.