IPL 2020, CSK vs SRH : धोनीच्या नावावर नवा विक्रम, हैदराबादविरुद्ध मैदानात उतरताच विक्रमाची नोंद

हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच धोनीच्या नावावर एका विक्रम होणार आहे.| (Csk Mahendra Singh Dhoni Most Capped Player In The IPL)  

IPL 2020, CSK vs SRH : धोनीच्या नावावर नवा विक्रम, हैदराबादविरुद्ध मैदानात उतरताच विक्रमाची नोंद
एम एस धोनी

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 14 वा सामना आज (2 ऑक्टोबर) खेळला जाणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जस (Chennai Super Kings) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आमनेसामने भिडणार आहेत. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) या सामन्यात मैदानात उतरताच त्याच्या नावावर एका विक्रम होणार आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळण्याच्या विक्रमाची नोंद धोनीच्या नावावर होणार आहे. (Csk Mahendra Singh Dhoni Most Capped Player In The IPL)

धोनीने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत 193 सामने खेळले आहेत. चेन्नईच्या सुरेश रैनाच्या (Suresh Raina) नावावरही 193 सामन्यांची नोंद आहे. त्यामुळे हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच धोनी आयपीएलमधील सर्वाधिक सामने खेळणारा एकमेव खेळाडू ठरेल.

षटकारांचं त्रिशतक करण्याची संधी

धोनीला हैदराबाद विरुद्ध आणखी एक विक्रमाची संधी आहे. अवघे 2 सिक्स मारताच हा विक्रम धोनीच्या नावावर होणार आहे. धोनीने आतापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 298 सिक्स लगावले आहेत. त्यामुळे 2 सिक्स लगावताच धोनीचं षटकारांच त्रिशतक पूर्ण होईल.

हिटमॅन रोहित दुसऱ्या क्रमांकावर

सर्वाधिक आयपीएल सामने खेळण्याच्या बाबतीत रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने आयपीएलमध्ये आतापर्यंत 192 सामने खेळले आहेत. पंजाब विरुद्ध 1 ऑक्टोबरला खेळण्यात आलेला सामना हा रोहितच्या कारकिर्दीतील 192 वा सामना ठरला. या सामन्यात रोहितने आयपीएलमधील 5 हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा रोहित तिसरा भारतीय खेळाडू ठरला. याआधी विराट कोहली (Virat Kohli) आणि सुरेश रैनाने (Suresh Raina) 5 हजार धावांचा टप्पा पार केला आहे.

चेन्नईची निराशाजनक कामगिरी

चेन्नईसाठी आयपीएलच्या 13 व्या मोसमाची सुरुवात निराशाजनक राहिली आहे. चेन्नईने यंदाच्या मोसमात 3 सामने खेळलेत. या 3 पैकी 2 सामन्यात चेन्नईचा पराभव झाला आहे. ताज्या आकडेवारीनुसार चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या म्हणजे 8 व्या क्रमांकावर आहे. चेन्नईला त्यांच्या स्टार खेळाडूंची उणीव भासतेय. मिस्टर आयपीएल सुरेश रैना आणि फिरकीपटु हरभजन सिंह (Harbhajan Singh) या दोघांनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. तर अंबाती रायुडू (Ambati Rayudu ) आणि ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) यांना दुखापतीमुळे काही सामने खेळता आले नाही. मात्र ते आता फिट आहेत. त्यामुळे आता चेन्नई हैदराबाद विरुद्ध कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, CSK vs DC | IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला ‘हा’ विक्रम करण्याची संधी

IPL 2020: चेन्नईसाठी खुशखबर…अंबाती रायडू आणि ब्राव्हो फिट, पुनरागमनासाठी सज्ज

(Csk Mahendra Singh Dhoni Most Capped Player In The IPL)

Published On - 4:42 pm, Fri, 2 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI