AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020, CSK vs SRH : हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी चेन्नईची तयारी, कोच स्टीफन फ्लेमिंगचा मास्टर प्लॅन

चेन्नईची या मोसमातील सुरुवात निराशाजनक राहिली आहे. (CSK Head Coach Master plan against Sunrisers Hyderabad)

IPL 2020, CSK vs SRH : हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी चेन्नईची तयारी, कोच स्टीफन फ्लेमिंगचा मास्टर प्लॅन
| Updated on: Oct 02, 2020 | 6:59 PM
Share

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 14 वा सामना आज खेळला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्जस (Chennai Super Kings) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आमनेसामने भिडणार आहेत. चेन्नईने याआधी खेळलेल्या 3 सामन्यांपैकी 2 सामन्यात पराभव झाला. तर 1 सामन्यात विजय झाला. चेन्नईची या मोसमातील सुरुवात निराशाजनक राहिली आहे. हैदराबाद विरोधातील सामन्यासाठी चेन्नई दोन हात करण्यासाठी सज्ज आहे. हैदराबाद विरोधातील या सामन्यासाठी चेन्नईचा मास्टर प्लॅन तयार आहे, असा खुलासा चेन्नईचा मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने (Stephen Fleming) केला आहे. (CSK Head Coach Master plan against Sunrisers Hyderabad)

काय म्हणाला फ्लेमिंग?

चेन्नई तब्बल 6 दिवसांच्या अंतराने चौथा सामना खेळत आहे. आम्हाला योग्य वेळेवर 6 दिवसांची विश्रांती मिळाली. चेन्नईने पहिले 3 सामने अगदी लवकर खेळले. हे सामने 3 वेगवेगळ्या स्टेडियममध्ये खेळण्यात आले. यामुळे या तीनही खेळपट्ट्यांवर सामने खेळणाऱ्या चेन्नईचे कौतुक करायला हवं, असं फ्लेमिंग म्हणाला. शेख झायेद मैदानावरील पहिला सामना आव्हानात्मक होता, असं फ्लेमिंग म्हणाला.

हैदराबाद विरुद्धच्या सामन्याआधी फ्लेमिंग म्हणाला की, “आम्ही मैदानात अनेक आव्हानांना सामोरे गेलो. आम्ही या 6 दिवसांच्या विश्रांतीचा पुरेपुर उपयोग केला. संघ म्हणून आम्हाला नक्की काय करायला हवं, यावर आम्ही फार अभ्यास केला. तसेच आम्ही कसून सराव केला”,असंही यावेळी फ्लेमिंगने नमूद केलं.

चेन्नईसाठी आनंदाची बातमी

यावेळेस फ्लेमिंगने चेन्नई समर्थकांसाठी आनंदाची बातमी दिली. “दुखापतग्रस्त अंबाती रायुडू आणि ड्वेन ब्रावो हे फीट असल्याचं म्हटलं. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात अंतिम 11 खेळाडूंमध्ये हे दोघेही पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहेत”, अशी माहिती फ्लेमिंगने दिली. मुंबई विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात रायुडूने चांगली खेळी केली. मात्र यानंतर रायुडूला दुखापतीचा त्रास जास्त तीव्रतेने जाणवू लागला. यामुळे रायुडूला 2 सामन्यांना मुकावे लागले. तर दुसऱ्या बाजूला ड्वेन ब्राव्होला दुखापतीमुळे कोणत्याच सामन्यात सहभागी होता आले नाही.

स्टीफन फ्लेमिंगची आयपीएल कारकिर्द

स्टीफन फ्लेमिंगने आयपीएलच्या पहिल्या मोसमात चेन्नईचे प्रतिनिधित्व केलं. या पहिल्या मोसमात फ्लेमिंगने 10 सामने खेळले. यात त्याने 119 च्या स्ट्राईक रेटने 196 धावा केल्या. फ्लेमिंगची 45 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. दरम्यान फ्लेमिंग हा सध्या चेन्नईच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडतोय.

संबंधित बातम्या : 

IPL 2020, CSK vs SRH, Live Score : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने

IPL 2020, CSK vs SRH : धोनीच्या नावावर नवा विक्रम, हैदराबादविरुद्ध मैदानात उतरताच विक्रमाची नोंद

(CSK Head Coach Master plan against Sunrisers Hyderabad)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.