VIDEO | ख्रिस गेलचे गगनचुंबी षटकार पाहून कोच जॉन्टी ऱ्होड्सची जबरदस्त रिअ‍ॅक्शन

पंजाब किंग्सचा (Punjab Kings) आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने (Chris Gayle) 5 चौकार आणि 2 सिक्ससह नाबाद 43 धावांची खेळी केली.

VIDEO | ख्रिस गेलचे गगनचुंबी षटकार पाहून कोच जॉन्टी ऱ्होड्सची जबरदस्त रिअ‍ॅक्शन
पंजाब किंग्सचा (Punjab Kings) आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने (Chris Gayle) 5 चौकार आणि 2 सिक्ससह नाबाद 43 धावांची खेळी केली.

चेन्नई | पंजाब किंग्सने (Punjab Kings) इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) 17 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 9 विकेट्सने शानदार विजय मिळवला. पंजाबचा हा या मोसमातील दुसरा विजय ठरला. पंजाबकडून कर्णधार लोकेश राहुलने (KL rahul)सर्वाधिक नाबाद 60 धावा केल्या. तर ख्रिस गेलने (Chris Gayle) 35 चेंडूत 43 धावांची शानदार नाबाद खेळी केली. या दोघांनी पंजाबला विजय मिळवून दिला. गेलने आपल्या या खेळीत 5 चौकार आणि 2 सिक्स लगावले. विशेष म्हणजे गेलने जयंत यादवच्या गोलंदाजीवर एक गगनचुंबी सिक्स लगावला. हा सिक्स पाहून पंजाबचा कोच जॉन्टी ऱ्होड्सही अवाक राहिला. (ipl 2021 pbks vs mi punjab kings vs mumbai indians jonty rhodes jumped after see chris gayle six)

गेलचा शानदार सिक्स

गेलने हा सिक्स सामन्यातील 15 व्या ओव्हरमध्ये लगावला. गेलने मारलेला हा सिक्स 93 मीटर लांबीचा होता. गेलने फटकावलेला सिक्स पाहून मुंबईचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्माने मान खाली घातली. तर पंजाबच्या डगआऊटमध्ये बसलेला जॉन्टी ऱ्होड्स उभे राहून जल्लोष करु लागला. गेलने मारलेला सिक्स पाहून ऱ्होड्सने जबरदस्त रिअ‍ॅक्शन दिली. आयपीएलमध्ये गेलच्या नावे 352 सिक्सची नोंद झाली आहे.

कर्णधार केएलचे अर्धशतत

कर्णधार केएल राहुलने 50 चेंडूत आपलं अर्धशतक लगावलं. केएलच्या आयपीएल कारकिर्दीतील हे 24 वं अर्धशतक ठरलं. केएलने आपल्या नाबाद 60 धावांच्या खेळीत 52 चेंडूंचा सामना केला. यामध्ये केएलने 3 चौकार आणि 3 सिक्स लगावले. यासह केएल पंजाबकडून सर्वाधिक अर्धशतक लगावणारा फलंदाज ठरला. केएलने शॉन मार्शचा रेकॉर्ड ब्रेक केला. मार्शने पंजाबकडून खेळताना 22 अर्धशतकं लगावली होती.

मयंक अग्रवालची 25 धावांची खेळी

पंजाबच्या विजयात सलामीवीर मयंक अग्रवालने (Mayank Agrawal) महत्वपूर्ण योगदान दिलं. मयंक आणि केएल या सलामी जोडीने पंजाबसाठी 53 धावांची भागीदारी केली. याआधी मुंबईच्या रोहित शर्माने (Rohit Sharma) 52 चेंडूत 5 चौकार आणि 2 सिक्ससह 63 धावा केल्या. रोहितने सूर्यकुमार यादवसोबत तिसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने 27 चेंडूत 33 धावा केल्या. पंजाबकडून मोहम्मद शमी आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर दीपक हुड्डा आणि अर्शदीप सिंह या जोडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

संबंधित बातम्या :

PBKS vs MI Live Score, IPL 2021 | केएल राहुलची नाबाद अर्धशतकी खेळी, पंजाबचा मुंबईवर 9 विकेट्ने शानदार विजय

IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर

(ipl 2021 pbks vs mi punjab kings vs mumbai indians jonty rhodes jumped after see chris gayle six)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI