महाराष्ट्रात 15 दिवसांची संचारबंदी, मुंबईतले IPL 2021 चे सामने रद्द करावे लागणार?

महाराष्ट्रात कोरोनाचे संकट पाहता महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध (Maharashtra Lockdown) लावण्याचा निर्णय घेतला आहे. 

महाराष्ट्रात 15 दिवसांची संचारबंदी, मुंबईतले IPL 2021 चे सामने रद्द करावे लागणार?
Wankhede Stadium
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 12:40 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट पाहता महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध (Maharashtra Lockdown) लावण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आज (बुधवार 14 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. राज्यात कलम 144 कलम लागू करण्यात आले आहे. यानुसार जीवनावश्यक बाबींवर कुठलेही निर्बंध न ठेवता इतर महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करून काही निर्बंध जारी करण्यात आले आहेत. (IPL 2021 : Wankhede Stadium matches not to be affected by state-wide curfew in Maharashtra)

आयपीएल 2021 मधील बरेच सामने राज्याची राजधानी मुंबईत खेळवले जात आहेत. नव्या घोषणेचा आयपीएलवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. स्पर्धेदरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या प्रवेशास बंदी आहे. तर मुंबईत थांबलेले संघ बायो बबलमध्ये आहेत. मैदानात येण्यापूर्वीपर्यंत त्यांनी मास्क घालणे अनिवार्य आहे. तसेच सरकारने आयपीएलवर बंदी घातली नाही. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे सरकारने आयपीएलबाबत घेतलेल्या नव्या निर्णयामुळे फारसा फरक पडणार नाही.

मुंबईत 10 सामने

आयपीएलचे 10 सामने मुंबईत होणार आहेत. हे सर्व सामने मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होतील. यातील नऊ सामने सायंकाळी साडेसात वाजता सुरू होतील. सध्या पाच संघ मुंबईत वास्वत्य करत आहेत. यापूर्वी, महाराष्ट्र सरकारने 5 एप्रिलपासून राज्यात नाइट कर्फ्यू लागू केला होता. त्याचादेखील आयपीएलवर कोणताही परिणाम झाला नाही. त्यानंतर बायो बबलचे काटेकोरपणे पालन करत सरकारने रात्री आठनंतरही संघांना सराव करण्यास परवानगी दिली आहे.

दोन सत्रांमध्ये खेळाडूंचा सराव

आयपीएलचं आयोजन, खेळाडूंचा सराव आणि बायो बबलचे नियम याबाबत बीसीसीआयने राज्य सरकारशी चर्चा केली आहे. संघांच्या सरावासंदर्भात क्रिकेट मंडळाने सरकारकडे विनंती केली होती. त्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव श्रीरंग घोलप म्हणाले की, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि वानखेडे स्टेडियमवर दुपारी 4 ते सायंकाळी 6.30 या वेळेत आणि सायंकाळी 7.30 ते रात्री 10 वाजेपर्यंत अशा दोन सत्रांमध्ये खेळाडूंना सराव करता येईल.

आयपीएलशी संबंधित सर्वजण बायो बबलमध्ये

ठाकरे सरकारने 14 एप्रिलपासून जारी केलेले नवीन आदेश. त्याअंतर्गत लोकल ट्रेन, बस, ऑटो-टॅक्सी या सेवा सुरू राहतील. सर्व अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते सायंकाळी 8 या वेळेत सुरु राहतील. अशा परिस्थितीत आयपीएल 2021 च्या सामन्यांवर बंदीचा काही परिणाम झालेला दिसत नाही. मुंबईतील सर्व सामने वानखेडे स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत आणि इथले कर्मचारीही बायो बबलमध्ये मुक्काम करत आहेत. प्रत्येक खेळाडू, कर्मचारी, संघ व्यवस्थापन, पंच, ब्रॉडकास्टर, ग्राऊंड्समन आणि इतर संबंधित लोकांची दररोज कोरोना टेस्ट केली जाते.

संबंधित बातम्या

CM Uddhav Thackeray : 14 एप्रिलपासून राज्यभर संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra Lockdown | लग्न समारंभासाठी पाहुण्यांची संख्या निम्म्यावर, ब्रेक द चेनची संपूर्ण नियमावली

(IPL 2021 : Wankhede Stadium matches not to be affected by state-wide curfew in Maharashtra)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.