AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs CSK : ठरलं! अर्जुन तेंडुलकरला आजचा सामना खेळवावा लागणार, का ते जाणून घ्या

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघ गेल्या सिझनमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यात यंदाच्या हंगामातही चांगली सुरुवात झाली नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या फॅन्सची चिंता वाढली आहे.

MI vs CSK : ठरलं! अर्जुन तेंडुलकरला आजचा सामना खेळवावा लागणार, का ते जाणून घ्या
MI vs CSK : मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अर्जुन तेंडुलकर? नेमकं काय झालं समजून घ्याImage Credit source: Twitter
| Updated on: Apr 08, 2023 | 1:18 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक कामगिरीने झाली. गेल्या सिझनमध्येही मुंबईचा संघ दहाव्या स्थानावर म्हणजेच सर्वात तळाशी राहीला होता. त्यामुळे यंदा तरी चांगली कामगिरी अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहे. दुसरीकडे, गेल्या दोन सिझनपासून अर्जुन तेंडुलकराला संधी दिली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे नवोदीत खेळाडू आपली चमक दाखवत असताना रोहित शर्मा मात्र वरिष्ठ खेळाडूंवर विश्वास दाखवत आहे. पण आता अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवावं लागणार अशीच स्थिती आहे.

काही फलंदाजांचा फॉर्म गेल्याने मुंबईच्या ताफ्यात चिंतेचं वातावरण आहे. पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलेला मुंबई इंडियन्स संघात आता तशी चमक दिसत नाही. त्यात जोफ्रा आर्जला दुखापत झाल्याने त्याचं खेळणं कठीण आहे. शुक्रवारी सराव करताना आर्चरच्या कोपऱ्याला चेंडू लागला. त्यामुळे आज त्याच्या खेळण्याबाबत संभ्रम आहे. त्याला दहा दिवस आरामाचा सल्ला देण्यात आला आहे.

आयपीएल 2023 मध्ये समालोचन करणाऱ्या सीएसकेचा माजी क्रिकेटपटू सुब्रमण्यम बद्रीनाथ यांनी आपल्या युटयूब चॅनेलवर ही माहिती दिली. त्यामुळे त्याचा पर्याय म्हणून अर्जुन तेंडुलकरकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे चेन्नई विरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर पदार्पण करेल अशी जोरदार चर्चा रंगली आहे. अर्जुन तेंडुलकर गोलंदाजीसोबत फलंदाजीही करतो.

मुंबईचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर पहिल्या सामन्यात काही खास करू शकला नव्हता. त्याला एकही गडी बाद करता आला नव्हता. 4 षटकात 8.20 च्या सरासरीने त्याने 33 धावा दिल्या होत्या. पहिल्याच सामन्यात मुंबईला आरसीबीकडून 8 गडी राखून पराभवाची धूळ चाखावी लागली होती.

मुंबई इंडियन्स अशी असू प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, कॅमरून ग्रीन, टिम डेविड, तिलक वर्मा, अरशद खान, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला आणि जेसन बेहरनडॉर्फ.

मुंबईचा पूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.