AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : एमएस धोनी ज्याच्या लग्नात जीव तोडून नाचला, तोच मित्र त्याचं प्रेम हिसकावत होता!

आयपीएल कारकिर्दित महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं चार वेळा जेतेपद जिंकलं आहे. आताही महेंद्रसिंह धोनी स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे. पण असं असताना दुसरीकडे त्याच्या मित्राची वाईट नजर त्याच्या पहिल्या प्रेमावर पडली आहे.

Video : एमएस धोनी ज्याच्या लग्नात जीव तोडून नाचला, तोच मित्र त्याचं प्रेम हिसकावत होता!
महेंद्रसिंह धोनीच्या पहिल्या प्रेमावर मित्राची वाईट नजर, अशी बोलवून दाखवली इच्छा Watch Video
| Updated on: Apr 06, 2023 | 8:18 PM
Share

मुंबई – आयपीएल 2023 स्पर्धेला आता रंग चढत चालला आहे. एक एका सामन्याच्या निकालामुळे गुणतालिकेचं गणित बदलत आहे. त्यामुळे प्रत्येक सामना आता महत्त्वाचा होत चालला आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं या स्पर्धेतील पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात जबरदस्त कमबॅक केलं. असं असलं तरी या स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीची जोरदार चर्चा आहे. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दोन उत्तुंग षटकार ठोकत क्रीडारसिकांची मनं जिंकली. एकीकडे महेंद्रसिंह धोनी आयपीएलमध्ये यशाची नवी शिखरं गाठत असताना दुसरीकडे त्याच्या प्रेमावर मित्राची वाईट नजर पडली आहे. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊयात

महेंद्रसिंह धोनी आणि माजी क्रिकेटपटू आरपी सिंह खूप चांगले मित्र आहेत. आरपी सिंह या आयपीएल स्पर्धेत समालोचकाची भूमिका बजावत आहे. तेव्हा त्याला एका कार्यक्रमात विचारलं गेलं की, तो महेंद्रसिंह धोनीची कोणती गोष्ट चोरू इच्छितो. तेव्हा त्याने बाइक असं उत्तर दिलं.

महेंद्रसिंह धोनीचं बाइक प्रेम सर्वश्रूत आहे. त्याच्याकडे एक दोन नव्हे खूप साऱ्या बाइक्स आहेत. या बाइक्समध्ये स्पोर्ट्सपासून क्रुझर बाइकचा समावेश आहे. धोनी अनेकदा रांचीच्या रस्त्यावर बाइकवर फिरताना दिसतो.

महेंद्रसिंह धोन आणि आरपी सिंह हे दोघं जिगरी मित्र आहेत. टीम इंडियाचा कर्णधारपद धोनीकडे असताना 2007 च्या टी 20 वर्ल्डकप संघात आरपी सिंहही होता. या संपूर्ण वर्ल्डकपमध्ये आरपी सिंहने चांगली गोलंदाजी केली होती. इतकंच काय तर आरपी सिंहच्या लग्नात धोनीने हजेरी लावली होती.

आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनी सर्वाधिक सामने खेळणारा एकमेव खेळाडू आहे. त्याने 15 पर्वात आतापर्यंत 234 सामने खेळले आहेत. या सिझनमध्ये 16 सामने खेळत त्याच्या नावावर 250 सामने होऊ शकतात. धोनीने आयपीएलमध्ये एकूण 232 षटकार ठोकले आहेत. या स्पर्धेत 18 षटकार ठोकताच 250 षटकारांचा मानकरी ठरणार आहे.तसेच ही कामगिरी करणारा पहिला विकेटकीपर फलंदाज ठरणार आहे.

चेन्नईचा पूर्ण स्कॉड : एमएस धोनी, डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अज

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.