AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs RCB Final: आयपीएलचा अंतिम सामना, संध्याकाळी अहमदाबादचं हवामान कसं राहणार ? हवामान विभागाने दिली ब्रेकिंग न्यूज

Ahmedabad Weather Report On 3 June: इंडियन प्रीमियर लीगचा अंतिम सामना आज होणार आहे. मात्र आजच पावसाची देखील शक्यता आहे. असं घडलं तर IPL फायनल होईल की नाही ? अहमदाबादमध्ये पाऊस पडण्याचे किती चान्सेस आहेत ? जाणून घ्या सविस्तर..

PBKS vs RCB Final: आयपीएलचा अंतिम सामना, संध्याकाळी अहमदाबादचं हवामान कसं राहणार ? हवामान विभागाने दिली ब्रेकिंग न्यूज
संध्याकाळी अहमदाबादचं हवामान कसं असेल ? Image Credit source: social media
| Updated on: Jun 03, 2025 | 8:37 AM
Share

Ahmedabad Rain Prediction IPL Final : सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या 18 व्या सीझनचा अंतिम सामना आज, अर्थात 3 जून 2025 रोजी खेळवण्यात येणार आहे. क्वॉलीफायर-1 जंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमने सर्वात पहिले फायनलमध्ये धडक मारली. तर क्वॉलीफायर-2 मध्ये मुंबईला हरवून पंजाब किंग्सच्या संघाने अंतिम फेरी गाठली. पण IPL 2025 च्या याच फायनलमध्ये पाऊस व्हिलन ठरण्याची शक्यता असून खरंच पाऊस पडेल का आणि तसं झालं तर मॅचचा रिझल्ट कधी आणि काय लागेल ? असे प्रश्न क्रिकेटचाहत्यांच्या मनात आहेत. जाणून घेऊया सविस्तर उत्तर…

IPL 2025 Final मध्ये येणार पावसाचा अडथळा ?

आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पावसाची शक्यता खूपच कमी आहे. या दिवशी अहमदाबादमध्ये हवामान उष्ण राहू शकते. हवामान विभागाच्या अहवालानुसार, पावसाची शक्यता फक्त 20 टक्के आहे. 3 जून रोजी हवामान स्वच्छ राहू शकते आणि अंतिम सामना देखील कोणत्याही व्यत्ययाशिवाय होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

क्वॉलीफायर-2 मध्ये पडला होता पाऊस

1 जून रोजी अहमदाबादमधील याच मैदानावर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात क्वॉलीफायर-2 चा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सुमारे दोन तास सतत पाऊस पडत होता, त्यामुळे सामना संध्याकाळी 7:30 ऐवजी राच्री 9: 45 वाजता सुरू झाला. या सामन्यात 2 तासांचा अतिरिक्त वेळ राखीव ठेवण्यात आला होता, त्यामुळे एकही षटक कमी करण्यात आले नाही आणि सामना पूर्ण 20-20 षटकांचा खेळवण्यात आला. या सामन्याचा निकाल उशिरा, मध्यरात्री 2 च्या सुमारास लागला.

पाऊस झाल्यास फायनल कोण जिंकणार ?

जर आज ( 3 जून 2025) आयपीएलच्या अंतिम सामन्यात पाऊस पडला तर हा सामना दोन तासांनी वाढवता येऊ शकतो. जर पावसामुळे आज सामना झाला नाही तर तो उद्या, अर्थात 4 जूनला खेळवला जाईल, उद्याचा दिवस फायनलसाठी रिझर्व्ह ठेवण्यात आला आहे. मात्र उद्याही जर सामना झाला नाही, तर पंजाब किंग्जला आयपीएल 2025 चा विजेता घोषित केले जाऊ शकते, कारण लीग सामन्यांमध्ये पंजाबचा संघ हा आयपीएल पॉइंट्स टेबलमध्ये आरसीबीपेक्षा पुढा होता. दोन्ही पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहेत. पॉइंट टेबलमध्ये दोन्ही संघांचे 19-19 गुण आहेत, परंतु पंजाबचा नेट रन रेट बंगळुरूपेक्षा चांगला आहे, त्यामुळे रजत पाटीदारचा बंगळुरू संघ दुसऱ्या स्थानावर आहे आणि श्रेयस अय्यरचा पंजाब पहिल्या स्थानावर आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.