AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरबद्दल अश्विन चटकन मनाला लागेल इतकं स्पष्ट बोलला, काहीही झालं तरी तो..

Ashwin On Arjun Tendulkar IPL 2026 : आयपीएल 2026 चा सीजन सुरु व्हायला आता काहीच दिवस उरलेत. येत्या 28 मार्च पासून आयपीएलचा महासंग्राम सुरु होईल. यंदाच्या सीजनध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लखनऊ सुपर जायंट्स टीमकडून खेळणार आहे.

IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरबद्दल अश्विन चटकन मनाला लागेल इतकं स्पष्ट बोलला, काहीही झालं तरी तो..
Ashwin on Arjun TendulkarImage Credit source: Youtube/LSG
| Updated on: Mar 23, 2026 | 11:15 AM
Share

IPL 2026 चा सीजन येत्या 28 मार्चपासून सुरु होणार आहे. आयपीएल सुरु व्हायला आता काहीच दिवस उरलेत. भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदाच्या सीजनमध्ये लखनऊ सुपर जायंट्स टीमकडून खेळणार आहे. अर्जुन तेंडुलकर गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्स टीमचा भाग आहे. पण त्याला मुंबईच्या टीमकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळत नव्हती. तो आता LSG कडून खेळणार आहे. पण तिथे सुद्धा अनेक दमदार वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे अर्जुन तेंडुलकरला लखनऊच्या टीममधून सुद्धा प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनचं सुद्धा हेच मत आहे.

LSG कडे मयांक यादव, एनरिच नॉर्त्जे, मोहम्मद शमी, मोहसीन खान, आवेश खान आणि आकाश सिंह यांच्यासारखे वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. “अर्जुन तेंडुलकर खेळणारच नाही. त्यांच्या टीममध्ये मयांक यादव, मोहसीन खान, आवेश खान आणि मोहम्मद शमी सारखा बॉलिंग लाइन अप आहे. तो कसा खेळणार?. त्या टीममध्ये बऱ्याच दुखापती झाल्याशिवाय मला अर्जुनला संधी मिळेल असं वाटत नाही” असं अश्विन सरळ बोलला.

आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकर आतापर्यंत किती मॅच खेळलाय?

आयपीएल 2026 साली डिसेंबर महिन्यात मिनी ऑक्शन पार पडलं. त्यावेळी लखनऊ सुपर जायंट्सने त्याला मुंबई इंडियन्सकडून ट्रेड केलं. अर्जुन तेंडुलकरला सर्वप्रथम मुंबई इंडियन्सने 2021 च्या मिनी ऑक्शनमध्ये 20 लाख रुपयात विकत घेतलं होतं. पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. 2023 च्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने पुन्हा त्याला 30 लाख रुपयात विकत घेतलं. अखेर त्याला संधी मिळाली.

कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध तो पहिला सामना खेळला. 2 ओव्हरमध्ये 17 धावा दिल्या. पण एकही विकेट मिळाला नाही. त्यानंतर तो सीजनमध्ये चार सामने खेळला. तीन विकेट काढले. आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली तो फक्त एक मॅच खेळला. आयपीएल 2024 आणि 2025 दोन्ही सीजनमध्ये लखनऊनची टीम सातव्या स्थानावर राहिली.

Follow Us
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ!
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवरच उगारला चाकू, पुढे...
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं फडणवीसांबाबत मोठं विधान, थेट...
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
Beed | पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना; शेतकरी हवालदिल
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
Buldhana | बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! सह्याद्री-अजिंठा पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी
NCP Banner | शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी अन्... राजकीय चर्चांना उधाण
आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये....
Shrirampur Crime Case | आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये मृतदेहासह पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन
मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह....
Asangaon to Vasind | मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह एक्स्प्रेस गाड्या अर्धा तास रांगेत
री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून...
Kalyan Collapsed Building | री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून उडी मारून...
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय घडामोडींना वेग