AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs SRH : हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये, चेन्नईचं घरच्या मैदानात पॅकअप!

Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Match Result, OPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 181 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हैदराबादने हे आव्हान इशान किशन याच्या खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केलं.

CSK vs SRH : हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये, चेन्नईचं घरच्या मैदानात पॅकअप!
Ishan Kishan CSK vs SRH IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: May 19, 2026 | 1:45 AM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या (Ipl 2026) 19 व्या मोसमातील 63 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सुरक्षित असा विजय मिळवला आहे. सीएसकेने चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 181 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हैदराबादने हे आव्हान इशान किशन आणि हेन्रिक क्लासेन या दोघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर 5 विकेट्सच्या मोबदल्यात आणि 6 बॉलआधी सहज पूर्ण केलं. हैदराबादने 19 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 181 धावा केल्या. हैदराबादचा हा या मोसामातील एकूण आठवा विजय ठरला. सनरायझर्स हैदराबादने यासह प्लेऑफमध्ये धडक दिली आहे. हैदराबादच्या या विजयासह गुजरात टायटन्सनेही प्लेऑफचं तिकीट मिळवलं आहे. तर चेन्नईचं पराभवामुळे प्लेऑफचं समीकरण अवघड झालंय.

सामन्याचा धावता आढावा

चेन्नईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. चेन्नईसाठी 8 पैकी पहिल्या 7 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. मात्र त्यापैकी एकालाही 50 हा आकडा गाठता आला नाही. चेन्नईसाठी डेवाल्ड ब्रेव्हीस याने 44 आणि कार्तिक शर्मा याने 32 धावांचं योगदान दिलं. त्या व्यतिरिक्त एकालाही 30 पार पोहचता आलं नाही. मात्र इतर फलंदाजांनी केलेल्या छोटेखानी मात्र निर्णायक खेळीच्या जोरावर चेन्नईला 7 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 180 धावांपर्यंत पोहचता आलं. हैदराबादसाठी कर्णधार पॅट कमिन्स याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर साकीब हुसैन याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

सनरायझसर्स हैदराबादची बॅटिंग

सनरायझर्स हैदराबादची सलामी जोडी स्फोटक सुरुवात करण्यात अपयशी ठरली. ट्रॅव्हिस हेड याने 6 तर अभिषेक शर्मा याने 26 धावा केल्या. इशान किशन आणि हेन्रिक क्लासेन या दोघांनी हैदराबादच्या विजयात बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. क्लासेनचं अर्धशतक 3 धावांनी हुकलं. क्लासेनने 26 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 6 फोरसह 47 रन्स केल्या.

चेन्नई विरुद्ध हैदराबाद स्कोअरकार्ड

इशान किशनची विजयी खेळी

क्लासेननंतर नितीश कुमार रेड्डी 11 धावा करुन आऊट झाला. तर अखेरच्या क्षणी इशान आऊट झाला. इशानने 47 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 7 फोरसह 70 रन्स केल्या. तर सलील अरोरा आणि एस रवीचंद्रन या जोडीने उर्वरित धावा करुन हैदराबादला विजयी केलं. सलीनने नाबाद 10 तर रवीचंद्रन याने 5 धावा केल्या. चेन्नई टीमसाठी मुकेश चौधरी याने दोघांना बाद केलं. अंशुल कंबोज, नूर अहमद आणि अकील हौसेन या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.