AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs RCB : सलग 2 सामन्यानंतर केकेआर एक्शन मोडमध्ये; पंजाब विरुद्ध प्लेइंग 11 मध्ये बदल फिक्स!

IPL 2026 KKR vs RCB : कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील आपल्या तिसऱ्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध 2 हात करणार आहे. केकेआर या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.

KKR vs RCB : सलग 2 सामन्यानंतर केकेआर एक्शन मोडमध्ये; पंजाब विरुद्ध प्लेइंग 11 मध्ये बदल फिक्स!
Kolkata Knight Riders IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 06, 2026 | 3:34 AM
Share

कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) आपल्या तिसऱ्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध 2 हात करणार आहे. उभयसंघातील हा सामना सोमवारी 6 एप्रिलला होणार आहे. सामना कोलाकातामधील इडन गार्डन्समध्ये होणार आहे. केकेआरला अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रेयस अय्यर याने पंजाब किंग्सला पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे पंजाब सोमवारी सलग तिसरा सामना जिंकून विजयी हॅट्रिक करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला केकेआरसमोर पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे केकेआर सलग 2 पराभवानंतर घरच्या मैदानात होणाऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निमित्ताने केकेआरची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असेल? हे आपण जाणून घेऊयात.

केकेआर-पंजाब हेड टु हेड

कोलकाता विरुद्ध पंजाब यांच्यात सोमवारी होणारा एकूण 36 वा सामना असणार आहे. केकेआरने पंजाब विरुद्ध या 35 पैकी 21 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पंजाबने कोलकाताला 13 वेळा पराभूत केलं आहे. तर उभयसंघातील 1 सामना रद्द करण्यात आला.

इडन गार्डन्समधील खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक

इडन्स गार्डन्समधील खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असल्याचं म्हटलं जातं. तसेच सामन्याच्या सुरुवातीला या मैदानात वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीतून मदत मिळते. मात्र त्यानंतर खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते.

अजिंक्य-रिंकूवर मोठी जबाबदारी

दरम्यान पंजाब विरूद्धच्या सामन्यात केकेआरचा कॅप्टन अजिंक्य आणि उपकर्णधार रिंकु सिंह या दोघांवर अधिकची जबाबदारी असणार आहे. सलग 2 सामने गमावल्याने तिसऱ्या सामन्यात केकेआरसमोर विजय मिळवण्याचं आव्हान आहे. अशात केकेआरला विजय मिळवायचा असेल तर अजिंक्य आणि रिंकूने धावा करणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजिंक्यने या मोसमात अर्धशतकाने सुरुवात केली. मात्र त्याला दुसऱ्या सामन्यात तसंच सातत्य कायम ठेवता आलं नाही. अजिंक्यने या मोसमातील 2 सामन्यांमध्ये एकूण 75 धावा केल्या आहेत. तर रिंकूने 2 सामन्यांत 68 धावा केल्या आहेत. त्यामुळे हे दोघे कशी कामगिरी करतात यावर केकेआर जिंकणार की पराभूत होणार? हे निश्चित होईल, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

केकेआरची पंजाब विरूद्धच्या सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन एलन, अंगकृष रघुवंशी (विकेटकीपर), कॅमरुन ग्रीन, रिंकू सिंह (उपकर्णधार), रमनदीप सिंह, सुनील नारायण, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, कार्तिक त्यागी, ब्लेसिंह मुजरबानी.

Follow Us
युद्धविरामानंतर इराणच्या तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट! परिसरात खळबळ
युद्धविरामानंतर इराणच्या तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट! परिसरात खळबळ.
काम करा नाहीतर पद...व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकनाथ शिंदेंचा थेट इशारा
काम करा नाहीतर पद...व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकनाथ शिंदेंचा थेट इशारा.
राऊतांच्या त्या वक्तव्यावर नवनाथ बन भडकले; म्हणाले, तुम्ही पाकिस्तान..
राऊतांच्या त्या वक्तव्यावर नवनाथ बन भडकले; म्हणाले, तुम्ही पाकिस्तान...
LPG वाटपाबाबत केंद्राचा मोठा निर्णय, पेट्रोलियम मंत्रालयाकडून...
LPG वाटपाबाबत केंद्राचा मोठा निर्णय, पेट्रोलियम मंत्रालयाकडून....
अवकाळीच्या 'अवकृपे'ने शेतकरी हवालदिल, वाशिमच्या 729 हेक्टवरील पिकांचं
अवकाळीच्या 'अवकृपे'ने शेतकरी हवालदिल, वाशिमच्या 729 हेक्टवरील पिकांचं.
राष्ट्रवादीत पुन्हा ठिणगी! पटेलांच्या सभेत अजित पवारांचा फोटो नाहीच
राष्ट्रवादीत पुन्हा ठिणगी! पटेलांच्या सभेत अजित पवारांचा फोटो नाहीच.
भोंदू खरातचा पाय आणखी खोलात! आता शिर्डी पोलीस खरातचा ताबा मागणार, कारण
भोंदू खरातचा पाय आणखी खोलात! आता शिर्डी पोलीस खरातचा ताबा मागणार, कारण.
युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन
युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन.
युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत
युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत.
युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्या
युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्या.