बुमरा या वर्षात कसोटी खेळणं जवळपास अशक्य

सचिन पाटील

सचिन पाटील | Edited By:

Updated on: Sep 26, 2019 | 7:59 PM

दुखापतीमुळे बुमराला (Jasprit Bumrah Test) विश्रांती देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला. डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून बुमराचं पुनरागमन होईल अशी संघ व्यवस्थापनाला अपेक्षा आहे.

बुमरा या वर्षात कसोटी खेळणं जवळपास अशक्य

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला (Jasprit Bumrah Test) संपूर्ण मालिकेला मुकावं लागणार आहे. त्याच्या जागी उमेश यादवचा संघात समावेश करण्यात आलाय. दुखापतीमुळे बुमराला (Jasprit Bumrah Test) विश्रांती देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला. डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून बुमराचं पुनरागमन होईल अशी संघ व्यवस्थापनाला अपेक्षा आहे.

बांगलादेश दौरा हे कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासाठी प्रमुख लक्ष्य नाही. त्यामुळे बुमराने पूर्णपणे फिट होऊनच पुनरागमन करावं, अशी संघ व्यवस्थापनाची व्यवस्था आहे. यासोबतच ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकातही बुमरा भारतीय संघाचं प्रमुख अस्त्र असेल, असं ‘आयएनएस’ला सूत्रांनी सांगितलं.

सूत्रांच्या माहितीनुसार, बुमराचं पुनरागमन वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून व्हावं, अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे. त्यामुळे बुमराच्या पुनरागमनासाठी कोणताही शॉर्टकट ठेवलेला नाही. पुन्हा एकदा संपूर्ण प्रक्रियेतून त्याला जावं लागेल आणि त्यानंतरच त्याची निवड होईल. बुमराला सध्या फिटनेसवर लक्ष देणं गरजेचं आहे. पण बांगलादेश दौऱ्यापूर्वी ते होणार नाही.

या सर्व प्रक्रियेत बुमरा या वर्षात होणाऱ्या एकाही कसोटी मालिकेत खेळणं अशक्य आहे. त्याला विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्येही त्याला भारताचं प्रतिनिधित्व करता येणार नाही. पुढील वर्षात होणारा टी-20 विश्वचषक पाहता भारतीय संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळल्यानंतर भारत बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. म्हणजे या वर्षात (ऑक्टोबर ते डिसेंबर 2019) पाच कसोटी सामने होतील.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI