Kapil Dev | तुम्हा सर्वांचे आभार, कपिल देव यांचं रुग्णालयातून ट्वीट

कपिल देव यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आणि चाहत्यांचे आभार मानले.

Kapil Dev | तुम्हा सर्वांचे आभार, कपिल देव यांचं रुग्णालयातून ट्वीट

नवी दिल्ली : ज्येष्ठ क्रिकेटर कपिल देव यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे (Kapil Dev Tweet). त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आणि चाहत्यांचे आभार मानले. “तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि काळजीसाठी धन्यावाद. तुम्हा सर्वांचं प्रेम बघून मी भारावून गेलो आहे”, असं ट्वीट त्यांनी केलं (Kapil Dev Tweet).

भारतीय संघाचे विश्वविजेते माजी कर्णधार कपिल देव यांना गुरुवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर नवी दिल्लीतील रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती ठिक आहे.

कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीच्या ओखला येथील फोर्टिस रुग्णालयात गुरुवारी रात्री उशिरा 1 वाजता भरती करण्यात आलं. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली.

रुग्णालयाच्या अधिकृत माहितीनुसार, कपिल देव यांना सध्या अतिदक्षता विभागात डॉ. अतुल माथुर यांच्या टीमच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. कपिल यांच्या प्रकृतीत सुधार असून काही दिवसात त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली जाईल.

कपिल देव यांना हार्टअटॅक आल्याचं कळताच, सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. कपिल देव यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी प्रार्थना केली.

कपिल देव यांची कारकीर्द

कपिल देव यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 131 टेस्ट आणि 225 वनडे सामने खेळले आहेत. देव यांनी टेस्टमध्ये 5 हजार 248 धावा केल्या आहेत. तर 434 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच एकदिवसीय कारकिर्दीत त्यांनी 3 हजार 783 धावा केल्या आहेत. तसेच 253 विकेट्सही झटकले आहेत. आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना देव यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 1994 मध्ये फरीदाबाद येथे खेळला होता (Kapil Dev Tweet).

संबंधित बातम्या :

Kapil Dev | दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *