रोहित शर्माच्या दुखापतीवरुन गोंधळाचे वातावरण; विराट कोहलीची नाराजी

या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या निवड समितीच्या बैठकीपूर्वी रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी अनुपलब्ध असेल, असे सांगण्यात आले होते. | Virat Kohli

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:09 PM, 26 Nov 2020
Lack of clarity confusion over Rohit Sharma injury says Virat Kohli

सिडनी: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)  याने फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या दुखापतीवरुन झालेल्या सावळ्या गोंधळाविषयी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. रोहित शर्माच्या दुखापतीविषयी बराच काळ गोंधळाचे आणि अनिश्चिततेचे वातावरण होते. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला बराच काळ वाट पाहावी लागली. ही चांगली गोष्ट नाही, असे विराट कोहली याने सांगितले. (Indian Cricket Team Skipper Virat Kohli on Rohit Sharma’s injury)

भारतीय संघ हा सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. यापूर्वी सिडनीत प्रसारमाध्यमांशी झालेल्या ऑनलाईन वार्तालापात विराट कोहली बोलत होता. यावेळी त्याने रोहित शर्माच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील रोहित शर्माच्या समावेशाविषयी शेवटपर्यंत सुरु असलेल्या गोंधळावर जाहीरपणे ताशेरे ओढले.

या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या निवड समितीच्या बैठकीपूर्वी रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी अनुपलब्ध असेल, असे सांगण्यात आले होते. आयपीएल स्पर्धेत खेळताना त्याला दुखापत झाल्याचा ईमेल आम्हाला आला होता. या दुखापतीचे बऱ्यावाईट परिणामांची रोहित शर्माला कल्पना देण्यात आली. ही बाब त्याला मान्यही होती. त्यामुळे रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी अनुपलब्ध असल्याचे सांगण्यात आल्याची बाब विराट कोहलीने निदर्शनास आणून दिली.

आयपीएल स्पर्धेतील दुखापतीमुळे रोहित शर्माच्या समावेशाविषयी होती शंका

रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने यंदा आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. या स्पर्धेत त्याच्या मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे रोहित शर्मा काही सामने खेळला नव्हता. तेव्हाच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. तेव्हा प्रोटोकॉलनुसार दुखापतग्रस्त असलेल्या रोहित शर्माला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. मात्र, रोहित शर्माचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी मिळावी, यासाठी निवड समितीवरील दबाव वाढला होता.

त्यामुळे निवड समितीने शेवटच्या क्षणी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माची निवड केली होती. भारताच्या मेडिकल टीमकडून बीसीसीआयला खेळाडूंच्या दुखापतीचे अहवाल मिळाल्यानंतर बीसीसीआयने त्याला ऑस्ट्रेलियात नेण्याचा निर्णय घेतला. रोहितला कसोटी संघात संधी दिली असली तरी एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 मालिकेसाठी त्याला विश्रांतीच देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

India Tour Australia | ठरलं! अखेर हिटमॅन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार, पण….

Rohit Sharma | ‘हिटमॅन’ रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार, बीसीसीआयकडून डॅमेज कंट्रोल?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोणत्याही क्रमांकावर बॅटिंगसाठी तयार : रोहित शर्मा

(Indian Cricket Team Skipper Virat Kohli on Rohit Sharma’s injury)