AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MS Dhoni IPL 2020 | मॅच फिनिशर धोनीचा फॉर्म हरवला?, चाहत्यांना हुरहुर

धोनीच्या चेन्नई टीमला टी-20 च्या सीजन-13 मध्ये काही विशेष कमाल करता आलेली नाही. (MS Dhoni Cricket Finisher form Lost IPL 2020)

MS Dhoni IPL 2020 | मॅच फिनिशर धोनीचा फॉर्म हरवला?, चाहत्यांना हुरहुर
| Updated on: Oct 03, 2020 | 2:00 PM
Share

नवी दिल्ली : मॅच फिनीशर महेंद्रसिंह धोनी…चौके, छक्के लगावून मॅच जिंकवणारा धोनी…मात्र याच मॅच फिनीशरचा फॉम सध्या कुठे हरवलाय, असा प्रश्न करोडो क्रिकेटप्रेमींना पडला आहे. (MS Dhoni Cricket Finisher form Lost IPL 2020)

याच महेंद्रसिंह धोनीनं 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताला 28 वर्षानंतर विश्वविजेता बनवलं होतं. धोनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं होतं. मात्र याच धोनीच्या चेन्नई टीमला टी-20 च्या सीजन-13 मध्ये काही विशेष कमाल करता आलेली नाही.

हैद्राबादविरोधातील मॅचमध्ये धोनी नाबाद राहिला. मात्र चेन्नईची टीम 7 धावांनी पराभूत झाली. सीजन-13 मध्ये हे दुसऱ्यांदा घडलं की महेंद्र सिंह धोनी नाबाद, मात्र टीम पराभूत झाली आहे. तर आतापर्यंत सर्व लीगमध्ये धोनी सहा वेळा नॉटआऊट राहिला. मात्र टीमला विजय काही मिळवता आला नाही.

विकेट किंपिंगमध्ये धोनीला तोड नाही. 39 वर्षीय धोनी स्टंपिगपासून कठिणातील-कठीण कॅच घेण्यातही माहीर आहे. मात्र बॅटींगसाठी क्रीजवर उतरल्यावर जुना महेंद्र सिंह धोनी मात्र हरवला आहे.

हैद्राबादच्या विरूद्ध धोनीनं 130.55 च्या स्ट्राइक रेटनं 36 बॉलमध्ये 47 धावा केल्या. यामध्ये 4 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.

हैद्राबादविरोधात चेन्नईची टीम 7 धावांनी पराभूत झाली. अशा वेळी हैद्राबादबरोबर धोनीनं आणखी एक सिक्स लागावला असता. तर मॅचचा परिणाम काही वेगळाच असता. मात्र पुन्हा एकदा धोनी मॅच फिनिश करण्यात अपयशी ठरला.

दरम्यान, तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जच्या पराभवाची हॅटट्रीक सुरू आहे. सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला हरवल्यानंतर चेन्नईला राजस्थान, दिल्ली आणि हैद्राबाद या तीन संघाकडून पराभव पत्करावा लागला आहे. हैद्राबादच्या गोलंदाजांनी या सामन्यात टिच्चून मारा करत चेन्नईच्या फलंदाजांना संधीच दिली नाही. आणि चेन्नईची टीम सीजन 13 मध्ये पॉईंट टेबलमध्ये तळाला पोहोचली आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी चेन्नई संघाला उर्वरीत 10 पैकी 7 सामन्यात विजय मिळवावा लागेल आणि त्यासाठी महेंद्र सिंग धोनीला आपल्या बॅटिंगची कमाल दाखवावी लागेल. (MS Dhoni Cricket Finisher form Lost IPL 2020)

संबंधित बातम्या : 

IPL 2020, CSK vs SRH : हैदराबादची चेन्नईवर 7 धावांनी मात, हैदराबादचा दुसरा विजय

Photo | धोनीच्या रेकॉर्ड मॅचमध्ये ‘प्रियम’ वादळ घोंगावलं, चेन्नईला आस्मान दाखवलं

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.