महिला क्रिकेटमधील 'सचिन तेंडुलकर' मिताली राजची टी-20 मधून निवृत्ती

भारतीय महिला क्रिकेट संघाची (Indian Women Cricket) माजी कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (T20 Cricket) निवृत्तीची घोषणा केला आहे. 2021 मधील एकदिवसीय विश्वचषकाच्या (Cricket World Cup) तयारीवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.

महिला क्रिकेटमधील 'सचिन तेंडुलकर' मिताली राजची टी-20 मधून निवृत्ती

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची (Indian Women Cricket) माजी कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (T20 Cricket) निवृत्तीची घोषणा केला आहे. 2021 मधील एकदिवसीय विश्वचषकाच्या (Cricket World Cup) तयारीवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं तिने यावेळी स्पष्ट केलं. 36 वर्षीय मितालीने 32 टी-20 सामन्यांमध्ये भारताच्या संघाचं नेतृत्व केलं. टी-20 सामन्यात 2000 धावांचा टप्पा पार करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे.

देशासाठी विश्वचषक जिंकायचा हे माझं स्वप्न असल्याचं मितालीने नमूद केलं. मिताली म्हणाली, “2006 पासून आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केले. आता यानंतर 2021 च्या विश्वचषकासाठी स्वतःला तयार करण्यासाठी आणि माझी सर्व शक्ती त्यावर केंद्रीत करण्यासाठी मी निवृत्तीचा निर्णय घेत आहे. देशासाठी विश्वचषक जिंकण्याचं माझं स्वप्न अजून बाकी आहे. मला त्यासाठी माझं सर्वस्व द्यायचं आहे.” भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अधिकृत वेबसाईटवर मितालीची वरील भूमिका नमूद करण्यात आली आहे.

मंडळाच्या सातत्यपूर्ण पाठिंबा आणि सहकार्यासाठी मितालीने बीसीसीआयचेही आभार मानले. तसेच भारतीय संघाला आगामी काळातील टी-20 मालिकेसाठी सदिच्छा दिल्या. ती म्हणाली, “बीसीसीआयच्या सातत्यपूर्ण पाठिंबा आणि सहकार्यासाठी मी त्यांचे आभार मानते. तसेच भारतीय संघाला त्यांच्या आगामी काळातील टी-20 मालिकांसाठी सदिच्छा देते.”

मिताली राजची कारकिर्द:

 टी-20एकदिवसीयकसोटी
सामने8920310
धावा2,3646,720663
सरासरी (फलंदाजी)37.5251.2951.00
अर्धशतक17524
शतक071
सर्वोत्तम धावसंख्या97*125*214
गोलंदाजी (सामने)617172
विकेट080
सरासरी (गोलंदाजी)-11.37-
सर्वोत्तम विकेट-3/4-
झेल195011

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *