AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी धोनीला फोन, मगच मैदानात उतरायाचा, ऋषभ पंतचं रहस्य उलगडलं

मुंबई : टीम इंडियाचा युवा विकेटकीपर ऋषभ पंतने (Rishabh Pant) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत केलेल्या जबरदस्त कामगिरीचा आयसीसीने गौरव केला. आयसीसीने त्याला उदयोन्मुख क्रिकेटपटूचा (ICC Men’s Emerging Cricketer of the Year) 2018 पुरस्कार जाहीर केला. इतकंच नाही तर विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वातील आयसीसीच्या कसोटी संघात ऋषभ पंतलाही स्थान देण्यात आलं. पंतच्या जबरदस्त कामगिरीचं श्रेय टीम […]

आधी धोनीला फोन, मगच मैदानात उतरायाचा, ऋषभ पंतचं रहस्य उलगडलं
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM
Share

मुंबई : टीम इंडियाचा युवा विकेटकीपर ऋषभ पंतने (Rishabh Pant) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत केलेल्या जबरदस्त कामगिरीचा आयसीसीने गौरव केला. आयसीसीने त्याला उदयोन्मुख क्रिकेटपटूचा (ICC Men’s Emerging Cricketer of the Year) 2018 पुरस्कार जाहीर केला. इतकंच नाही तर विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वातील आयसीसीच्या कसोटी संघात ऋषभ पंतलाही स्थान देण्यात आलं. पंतच्या जबरदस्त कामगिरीचं श्रेय टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला जातं. त्याबाबचा खुलासा टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीच केला आहे. ऋषभ पंत प्रत्येक कसोटी मालिकेदरम्यान दररोज धोनीला फोन करुन त्याच्याशी सल्लामसलत करत होता, असं रवी शास्त्री यांनी सांगितलं.

युवा पंतने आतापर्यंत 9 कसोटी, 3 वन डे आणि 10 टी 20 सामने खेळले आहेत.

धोनीबद्दल बोलताना रवी शास्त्री म्हणाले, “धोनी संघात नसला तरी तो टीममध्ये असतो. उदाहरणच द्यायचं झालं तर, ऋषभ पंत सातत्याने धोनीशी बातचीत करत असतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान, पंत दररोज धोनीशी फोनवरुन बोलत होता. या संपूर्ण मालिकेत पंत सर्वात जास्त केवळ धोनीशीच बोलत होता. पंत धोनीला आपला हिरो मानतो, त्याला धोनीसारखंच व्हायचं आहे”

दरम्यान, धोनीसारखा खेळाडू 30-40 वर्षातून एकदा येतो. धोनीची जागा कोणीही घेऊ शकत नाही, अशी स्तुतीसुमनं रवी शास्त्री यांनी उधळली होती.

धोनीसारखे खेळाडू 30-40 वर्षातून एकदा येतात. मी भारतीयांना हेच सांगतो, जोपर्यंत धोनी खेळत आहे, तोपर्यंत आनंद लुटा. धोनीने निवृत्ती घेतली तर निर्माण होणारी पोकळी भरुन निघणार नाही, असंही रवी शास्त्रींनी नमूद केलं.

संबंधित बातम्या 

ICC चे सगळेच पुरस्कार विराटला, तीनही अवॉर्ड जिंकणारा एकमेव क्रिकेटर

ICC रँकिंग : भारत आणि विराट सर्व काही अव्वल!

‘मी सचिनला चिडलेलं पाहिलंय, पण धोनीला नाही’  

14 वर्ष खेळूनही मी ‘ती’ तक्रार करु शकत नाही: धोनी   

IND vs AUS: भारताने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका जिंकली!  

धोनीला सचिन तेंडुलकरचा एक सल्ला 

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?