'मी सचिनला चिडलेलं पाहिलंय, पण धोनीला नाही'

मेलबर्न: भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन वन डे सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली आणि इतिहास रचला. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि हुकमी फिनिशर महेंद्रसिंह धोनीच्या जबरदस्त नाबाद 87 धावांच्या जोरावर भारताने तिसऱ्या आणि अखेरच्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर 7 विकेट्स राखून मात केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला यजुवेंद्र चहलच्या फिरकीने 48.4 षटकात सर्वबाद 230 धावात …

'मी सचिनला चिडलेलं पाहिलंय, पण धोनीला नाही'

मेलबर्न: भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन वन डे सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली आणि इतिहास रचला. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि हुकमी फिनिशर महेंद्रसिंह धोनीच्या जबरदस्त नाबाद 87 धावांच्या जोरावर भारताने तिसऱ्या आणि अखेरच्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर 7 विकेट्स राखून मात केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला यजुवेंद्र चहलच्या फिरकीने 48.4 षटकात सर्वबाद 230 धावात रोखलं होतं. ऑस्ट्रेलियाचं 231 धावांचं आव्हान भारताने सहज पार केलं.

भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर महेंद्रसिंह धोनीवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही धोनीची तोंडभरुन स्तुती केली आहे. “मी अनेक वेळा सचिन तेंडुलकरला नाराज होताना, चिडताना पाहिलं आहे, मात्र महेंद्रसिंह धोनीला नाही” असं रवी शास्त्री यांनी म्हटलं. इतकंच नाहीतर धोनीसारखा खेळाडू 40 वर्षानंतर एकदा येतो, त्याची जागा घेणं हे कोणालाही अशक्य आहे, असंही रवी शास्त्री म्हणाले.

या मालिकेत सलग तीन अर्धशतकं झळकावणाऱ्या धोनीला मॅन ऑफ द सीरिज अर्थात मालिकावीराने गौरवण्यात आलं. 37 वर्षीय धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीनही वन डे सामन्यात भारताला आवश्यक असताना अर्धशतकी खेळी केली. पहिल्या सामन्यात 51, दुसऱ्या सामन्यात 55 आणि तिसऱ्या निर्णायक वन डेमध्ये धोनीने नाबाद 87 धावा केल्या.

धोनीच्या कामगिरीबद्दल रवी शास्त्री म्हणाले, “धोनी आमच्या महान खेळाडूंपैकी एक आहे. मी कोणत्याही व्यक्तीला इतकं शांत पाहिलं नाही. मी अनेकवेळा सचिनला नाराज होताना पाहिलं आहे, मात्र धोनीला नाही”

धोनीसारखे खेळाडू 30-40 वर्षातून एकदा येतात. मी भारतीयांना हेच सांगतो, जोपर्यंत धोनी खेळत आहे, तोपर्यंत आनंद लुटा. धोनीने निवृत्ती घेतली तर निर्माण होणारी पोकळी भरुन निघणार नाही, असंही रवी शास्त्रींनी नमूद केलं.

संबंधित बातम्या 

14 वर्ष खेळूनही मी ‘ती’ तक्रार करु शकत नाही: धोनी   

IND vs AUS: भारताने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका जिंकली!  

धोनीला सचिन तेंडुलकरचा एक सल्ला 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *