14 वर्ष खेळूनही मी 'ती' तक्रार करु शकत नाही: धोनी

मेलबर्न: भारताने ऑस्ट्रेलियात इतिहास रचत, तीन वन डे सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि हुकमी फिनिशर महेंद्रसिंह धोनीच्या जबरदस्त नाबाद 87 धावांच्या जोरावर भारताने तिसऱ्या आणि अखेरच्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर 7 विकेट्स राखून मात केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला यजुवेंद्र चहलच्या फिरकीने 48.4 षटकात सर्वबाद 230 धावात रोखलं …

14 वर्ष खेळूनही मी 'ती' तक्रार करु शकत नाही: धोनी

मेलबर्न: भारताने ऑस्ट्रेलियात इतिहास रचत, तीन वन डे सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि हुकमी फिनिशर महेंद्रसिंह धोनीच्या जबरदस्त नाबाद 87 धावांच्या जोरावर भारताने तिसऱ्या आणि अखेरच्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर 7 विकेट्स राखून मात केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला यजुवेंद्र चहलच्या फिरकीने 48.4 षटकात सर्वबाद 230 धावात रोखलं होतं. ऑस्ट्रेलियाचं 231 धावांचं आव्हान भारताने सहज पार केलं.

या मालिकेत सलग तीन अर्धशतकं झळकावणाऱ्या 37 वर्षीय धोनीला मॅन ऑफ द सीरिज अर्थात मालिकावीराने गौरवण्यात आलं.  भारताला गरज असताना धोनीने टिच्चून फलंदाजी करत तीनही सामन्यात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे भारताला वन डे सामन्यांच्या मालिकेतही ऐतिहासिक विजय मिळवता आला.

धोनीच्या जबरदस्त कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. त्यावेळी धोनीने संघ व्यवस्थापक आपल्याला ज्या नंबरवर फलंदाजीला पाठवेल, त्या नंबरवर खेळण्यास तयार असल्याचं सांगितलं.

“मी कोणत्याही नंबरवर फलंदाजी करण्यास आनंदी असतो. संघाला माजी कोणत्या क्रमांकावर गरज आहे, हे महत्त्वाचं आहे. मी 6 व्या नंबरवर फलंदाजी करु शकणार नाही, हे 14 वर्ष खेळल्यानंतर मी म्हणू शकत नाही” असं धोनी म्हणाला.

या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये धोनी पाचव्या नंबरवर फलंदाजीसाठी आला होता, त्यानंतर आजच्या सामन्यात धोनीला चौथ्या नंबरवर फलंदाजीला पाठवण्यात आलं. आजच्या विजयानंतर धोनी म्हणाला “ही संथ खेळपट्टी होती, इथे फटके मारणे अवघड होतं. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज उत्तम गोलंदाजी करत होते, त्यामुळे इच्छा असूनही मोठे फटके मारता येत नव्हते. त्यामुले सामना शेवटपर्यंत घेऊन जायचं असं आम्ही ठरवलं होतं”

धोनीने यावेळी केदार जाधवचंही कौतुक केलं. केदारने जबरदस्त खेळी केली, आम्ही आखलेल्या योजनेप्रमाणे त्याने अंमलबजावणी केली, असं धोनी म्हणाला.

8 वर्षांनी मालिकावीर

धोनीला आज 8 वर्षांनी मालिकावीराचा किताब मिळाला. यापूर्वी त्याला 2011 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या वन डे मालिकेत मालिकावीराचा मान मिळाला होता. धोनीचा हा सातवा सामनावीराचा किताब आहे.

सलग तीन अर्धशतकं

धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सलग तीन अर्धशतकं झळकावली. पहिल्या सामन्यात 51 धावा केल्या, हा सामना भारताने गमावला होता. त्यानंतर अॅडिलेडमध्ये धोनीने नाबाद 55 धावा केल्या. हा सामना भारताने 6 विकेट्सने जिंकला. तर आजच्या सामन्यात धोनीने नाबाद 87 धावा केल्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *