AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ, पराभवानंतर शिवराज राक्षे यांनी पंचाला लाथ मारल्याने वाद

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे याचा पराभव झाल्यानंतर त्यांनी पंचाच्या निकालाविरोधात नाराज व्यक्त करीत त्यांना लाथ मारल्याचा प्रकार घडल्याने गोंधळ उडाला आहे. आपण डबल महाराष्ट्र केसरी होतो, तिसऱ्यांदा होणार होतो म्हणून आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप राक्षे याने केला आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ, पराभवानंतर शिवराज राक्षे यांनी पंचाला लाथ मारल्याने वाद
Shivraj Rakshe kicked the umpire after defeat
| Updated on: Feb 02, 2025 | 8:27 PM
Share

अहिल्यानगरीतील महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागले आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गादी विभागातून नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपान्त्य फेरीसाठी सामना रंगला असताना पंचानी दिलेला निर्णय पसंत न पडल्याने शिवराज राक्षे यांनी पंचाला लाथ मारल्याने गोंधळ उडाला आहे. शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली आणि त्यांची कॉलर देखील पकडल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे.

नांदेड डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अहिल्यानगरात सायंकाळी सात वाजता हा उपांत्य फेरीचा सामना सुरु झाला होता. त्यावेळी शिवराज राक्षे याला पराभूत झाल्याचे जाहीर केल्यानंतर पराभूत कुस्तीपटू शिवराज राक्षे संतापला आणि त्याने थेट पंचांनाच लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवराज राक्षे याने नंतर पंचाची कॉलर देखील पकडल्याने पोलिसांना हस्तक्षेप करीत हे भांडण सोडवावे लागेले आहे.

कुस्तीचा रिव्ह्यू  दाखवावा

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे याचा पराभव झाल्यानंतर त्यांनी पंचाच्या निकालाविरोधात नाराज व्यक्त करीत त्यांना लाथ मारल्याचा प्रकार घडल्याने गोंधळ उडाला आहे. या प्रकरणात आता शिवराज राक्षे याने आपला रिव्हूय दाखविण्यात यावा आणि माझे खांदे आणि पाठ टेकलेली असेल तर आपण स्वत:च कूस्ती सोडून बाहेर पडतो असे म्हटले आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे.

काका पवार काय म्हणाले ?

दोन्ही मुले आमचीच आहेत. पंचानी जर निकाल चुकीचा दिला असेल तर राग येऊ शकतो. त्याचे वर्षे वाया गेलेच ना.?  वर्षभर तयारी केलेली असते त्या रागातून असे घडू शकते असे ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक काका पवार यांनी म्हटले आहे.  जर त्याचे खांदे टेकले नसतील आणि पाठ टेकली नसेल तर असे घडू शकते असेही काका पवार यांनी म्हटले आहे. ही स्पर्था आमदार संग्राम जगताप यांनी चांगल्या प्रकारचे नियोजन करून भरवली आहे असेही काका पवार यांनी म्हटले आहे.

अहिल्यानगरीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत आज होती. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यंदा महाराष्ट्र केसरी – 2025 चा मानकरी कोण होणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. गादी विभागातून नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ असा यांच्यात उपान्त्य फेरीसाठी सामना होता. तर माती विभागातून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात आज उपान्त्य फेरीसाठी लढत होणार होती. या दोन्ही उपांत्य फेरीत विजयी होणाऱ्या पैलवानांचा अंतिम सामना रंगणार आहे.

महेंद्र आणि पृथ्वीराज फायनलमध्ये

शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सेमीफायनल मॅच सुरु होती. यांच्यातील विजेता अंतिम फायनलसाठी निवडला जाणार होता. ही कुस्ती मॅटवर होणार होती. सोलापूरचा महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीचा साकेत यादव यांच्यात झालेल्या सेमी फायनलमध्ये महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला आहे. सलग दुसऱ्या वर्षी महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला आहे. आता महेंद्र गायकवाड आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्या अंतिम लढत होणार आहे.  महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी नेते उपस्थित होते.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.