17 तासानंतर भारताने पुन्हा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली, असं केलं पराभूत
आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा दुसऱ्यांदा धुव्वा उडवला. हा पराभव इतक्यावरच थांबला नाही. भारताने फुटबॉल मैदानातही पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. पाकिस्तानचं भारतासमोर काही एक चाललं नाही.

भारताने पाकिस्तानला मिळेल तिथे ठेचायचा चंग बांधला आहे. मग ते युद्धाचं मैदान असो की खेळाचं.. भारत मिळेत तिथे पाकिस्तानच्या नांग्या ठेचत आहे. आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने दोनदा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. इतकंच काय तर डोकंच वर काढू दिलं नाही. त्यामुळे पराभवाची मालिका सुरु आहे. ही मालिका आता क्रिकेटच्या मैदानापुरता मर्यादीत राहिली नाही. भारतीय फुटबॉल संघाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली.भारतीय क्रिकेट संघाने दुबईत 21 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजता पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं त्यानंतर 17 तासांनी म्हणजेच 22 सप्टेंबरला भारताच्या युवा फुटबॉल संघाने कमाल करत पाकिस्तानला पराभूत केलं. श्रीलंकेतील कोलंबोत साउथ एशियन फुटबॉल फेडरेशनच्या अंडर 17 चॅम्पियनशिप स्पर्धा सुरु आहे. आशिया कपप्रमाणेच SAFF चॅम्पियनशिपमध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच गटात होते. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यात भारताने पाकिस्तानचा 3-2 ने धुव्वा उडवला. तसेच गटात पहिलं स्थान कायम ठेवलं आहे.
भारतीय संघाने पाकिस्तानचा 3-2 असा पराभव केला आणि तिन्ही सामने जिंकून गटात पहिले स्थान मिळवले. भारताने या सामन्यात आक्रमक खेळीचं दर्शन घडवलं. अर्धा तासापर्यंत दोन्ही संघ पहिल्या गोलसाठी धडपडत होते. त्यात भारताचा आक्रमक पवित्रा पाहून पाकिस्तान बॅकफूटवर गेलं होतं. 31 व्या मिनिटाला. डल्लामुओ गंगटेने गोल करून त्यांना 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पाकिस्तानच्या मुहम्मद अब्दुल्लाहने 43 व्या मिनिटाला पेनल्टीचं रुपांतर गोलमध्ये केलं आणि बरोबरी साधली. दुसऱ्या डावात भारताने पुन्हा आघाडी घेतली. 63व्या मिनिटाला गुनलिबा वांगखेरकपमने गोल करून 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. 70 व्या मिनिटाला हमजा यासिरने दुसरा गोल केला आणि 2-2 अशी बरोबरी साधली.
पाकिस्तानला दुसऱ्या गोलनंतर मिळाला दिलासा फार काळ टिकाला नाही. अवघ्या तीन मिनिटांनी भारताने सामन्यात तिसऱ्यांदा आघाडी घेतली.रेहान अहमदने 73 व्या मिनिटाला गोल करून 3-2 अशी स्थिती आणली. त्यानंतर पाकिस्तानला संधीच दिली नाही. 90 मिनिटांपर्यंत पाकिस्तान गोलसाठी झुंजत राहिला पण यश मिळालं नाही. भारतीय संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला असून नेपाळशी सामना होणार आहे. तर पाकिस्तानचा सामना बांगालादेशशी होईल. भारताने ही स्पर्धा सर्वाधिक म्हणजे सहा वेळा जिंकली आहे.
