'त्या' पाकिस्तानी खेळाडूंची नावं सांगणार, दानिश कनेरियाने एकवटला धीर

युनूस खान, इंजमाम उल हक मोहम्मद युसूफ, शोएब अख्तर यांच्यासारखे खेळाडू धर्माचं बंधन झुगारुन चांगली वागणूक द्यायचे, असंही दानिशने सांगितलं.

Danish Kaneria on Shoaib Akhtar's allegations, ‘त्या’ पाकिस्तानी खेळाडूंची नावं सांगणार, दानिश कनेरियाने एकवटला धीर

इस्लामाबाद : पाकिस्तानी क्रिकेट संघातील खेळाडू दानिश कनेरिया हिंदू असल्यामुळे त्याला टीममधील इतर सदस्य वाईट वागणूक द्यायचे, असा गौप्यस्फोट माजी गोलंदाज शोएब अख्तरने केला होता. त्यानंतर, आपल्याला त्रास देणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंची नावं सांगणार असल्याचं दानिशने (Danish Kaneria on Shoaib Akhtar’s allegations) धीर एकवटून सांगितलं आहे.

‘शोएब अख्तरने जे सांगितलं ते सत्य आहे. मी हिंदू आहे म्हणून माझ्याशी न बोलणाऱ्या सर्व खेळाडूंची नावं मी जाहीर करणार आहे. याआधी या विषयावर बोलण्याची माझी हिंमत नव्हती. पण आता मी बोलणार’ असं दानिशने ‘एएनआय’ला सांगितलं आहे.

शोएब अख्तरने एका चॅट शोमध्ये बोलताना दानिश कनेरिया हिंदू असल्याने इतर पाकिस्तानी खेळाडू त्याला योग्य वागणूक देत नव्हते, असं सांगितलं होतं. सोबत जेवणावरुनही दानिशला डिवचलं जात असल्याचं शोएबने सांगितलं होतं.

एकीकडे संघात दुजाभाव करणारे खेळाडू असताना युनूस खान, इंजमाम उल हक मोहम्मद युसूफ, शोएब अख्तर यांच्यासारखे खेळाडू धर्माचं बंधन झुगारुन चांगली वागणूक द्यायचे, असंही दानिशने सांगितलं.

ICC ने विचारले दशकातील सर्वश्रेष्ठ कर्णधार कोण? क्रिकेट चाहते म्हणाले…

पाकिस्तानी संघात कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दानिश चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघात स्थान मिळवणारा दानिश हा दुसरा हिंदू धर्मीय खेळाडू आहे. याआधी अनिल दलपत हे पाकिस्तानी संघातील एकमेव हिंदू क्रिकेटपटू (Danish Kaneria on Shoaib Akhtar’s allegations) होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *