AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paris Olympics 2024 : जर्मनी विरुद्धच्या सेमीफायनल मॅचआधी भारतीय हॉकी टीमला मोठा झटका

Paris Olympics 2024 : भारतीय हॉकी टीम पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये दमदार प्रदर्शन करतेय. रविवारी झालेल्या क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये भारताने ब्रिटनला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभवाचा पाणी पाजलं. भारतीय हॉकी टीम आता सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. मंगळवारी जर्मनी विरुद्ध लढत आहे. त्याआधी भारतीय हॉकी टीमला धक्का बसला आहे.

Paris Olympics 2024 : जर्मनी विरुद्धच्या सेमीफायनल मॅचआधी भारतीय हॉकी टीमला मोठा झटका
india beats britain in hockey
| Updated on: Aug 05, 2024 | 8:46 AM
Share

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी टीम शानदार प्रदर्शन करत आहे. हॉकीमधला भारताचा सुवर्णकाळ लवकरच परत येईल हा विश्वास देशवासियांमध्ये निर्माण झाला आहे. टोक्यो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक मिळवलं होतं. आता भारतीय हॉकी टीम सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. महत्त्वाच म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी टीमने चांगल्या बलाढ्य संघांना नमवलय. मंगळवारी सेमीफायनलमध्ये भारताचा सामना जर्मनी विरुद्ध होणार आहे. त्याआधी हरमनप्रीत सिंहच्या भारतीय हॉकी टीमला मोठा झटका बसला आहे. क्वार्टर फायनलमध्ये अमित रोहिदासच्या स्टिकचा चुकून ब्रिटनच्या खेळाडूच्या शरीराला स्पर्श झाला. त्यासाठी अमितला रेड कार्ड दाखवण्यात आलं. भारत त्यानंतर 10 खेळाडूंनिशी मैदानात खेळत होता. अमित रोहिदासला एक सामन्याच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली असून तो सेमीफायनल खेळू शकणार नाही.

रेड कार्ड म्हणजे एका सामन्याच्या बंदीची शिक्षा. त्या खेळाडूला टुर्नामेंटमधील पुढचा सामना खेळता येत नाही. “4 ऑगस्टला भारत विरुद्ध ब्रिटन सामन्याच्यावेळी FIH आचारसंहितेच उल्लंघन झालय. त्यासाठी अमित रोहिदासला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात येतय. निलंबन मॅच नंबर 35 साठी आहे. म्हणजेच जर्मनी विरुद्ध सेमीफायनल सामना. अमित रोहिदास या सामन्यात खेळू शकणार नाही. भारत केवळ 15 प्लेयर्ससह खेळेल” असं FIH च्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.

सुरुवातीला ही घटना गंभीर मानली नाही

क्वार्टर फायनल मॅचमध्ये 31 वर्षीय अमित रोहिदासची ब्रिटनचा फॉरवर्ड विल कॅलनन बरोबर भिडाभीड झाली. यावेळी रोहिदासची हॉकी स्टिक कॅलननच्या चेहऱ्याजवळून गेली. मैदानावरील मॅच रेफ्ररीने सुरुवातीला ही घटना गंभीर मानली नाही. वीडियो रेफरल पाहिल्यानंतर निर्णय बदलला. रोहिदासला रेडकार्ड दाखवलं.

जबरदस्त झुंज

भारत आणि ब्रिटनमध्ये काल रंगतदार सामना झाला. 60 मिनिटांचा खेळ भारतीय क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढवणारा होता. पहिला सत्रात दोन्ही संघांनी जबरदस्त झुंज दिली. त्यामुळे या सत्रात 0-0 अशी बरोबरी होती. दुसऱ्या सत्रात दोन्ही टीम्सनी 1-1 गोल केलं. त्यानंतर सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. यावेळी भारताने 4-2 अशी आघाडी घेत विजय निश्चित केला.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!