Ranji Trophy Final: तिसर्या दिवशी जम्मू काश्मीरने सामन्यावर मिळवली पकड, कर्नाटकचा निम्मा संघ तंबूत
रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत जम्मू काश्मीर आणि कर्नाटक हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात जम्मू काश्मीरने प्रथम फलंदाजी करताना 584 धावा केल्या. तसेच कर्नाटकचा निम्मा संघ तंबूत पाठवून सामन्यावर मजबूत पकड मिळवली.

रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना तिसऱ्या दिवशी जम्मू काश्मीरच्या पारड्यात झुकला आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जम्मू काश्मीरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कारण पहिल्या डावात आघाडी मिळवली की विजयाची खात्री असते. जम्मू काश्मीरने प्रथम फलंदाजी करत सर्व गडी गमवून 584 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना कर्नाटकने 5 गडी गमवून 220 धावा केल्या. अजूनही कर्नाटकचा संघ 364 धावांनी पिछाडीवर आहे. तसेच दोन सामन्यांचा खेळ शिल्लक आहे. चौथ्या दिवशी कर्नाटकचा खेळ झटपट आटोपला तर जम्मू काश्मीरच्या विजयाच्या अपेक्षा वाढू शकतात. तिसरा दिवसाचा खेळ संपला तेव्हा मयंक अग्रवालने नाबाद 130 आणि कृथिक कृष्णाने नाबाद 27 धावांची खेळी आहे. आता ही जोडी आणखी किती धावांची भर घालते हे पाहणं चौथ्या दिवशी औत्सुक्याचं ठरणार आहे.
कर्नाटकचा डाव
कर्नाटककडून केएल राहुल आणि मयंक अग्रवाल ही जोडी मैदानात उतरली होती. संघाच्या 27 धावा असताना केएल राहुल अवघ्या 13 धावा करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला कर्णधार देवदत्त पडिक्कल काही खास करू शकला नाही. त्याचा खेळ अवघ्या 11 धावांवर आटोपला. संघाच्या 57 धावा असताना दोन धक्के एका पाठोपाठ एक मिळाले. त्यामुळे कर्नाटकचा संघ बॅकफूटवर गेला. दोघांना खातंही खोलता आलं नाही. करूण नायर आणि स्मरण रविचंद्रन खात न खोलता तंबूत परतले. त्यानंतर श्रेयस गोपाळ 27 धावांची खेळी करून बाद झाला. असं असताना मयंक अग्रवाल एकाकी झुंज देत आहे. त्याने 207 चेंडूत नाबाद 130 धावा केल्या. तर कृथिक कृष्णाने 75 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या आहेत.
Back-to-back rippers 🔥
Karun Nair ✅ Smaran Ravichandran ✅
Auqib Nabi and J&K are on a roll in the Final 👌
Updates ▶️ https://t.co/G0ytZLEyNB@IDFCFIRSTBank | #RanjiTrophy pic.twitter.com/r9QAH28O8f
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 26, 2026
कर्नाटकवर अकिब नबी दार भारी पडला. त्याने 14 षटकात 32 धावा देत 3 गडी बाद केले. यात केएल राहुल, करूण नायर आणि स्मरण रविचंद्रन यांची विकेट आहे. तर सुनील कुमारने 14 षटकात 45 धावा देत 1 गडी, तर युधवीर सिंग चरकने 10 षटकात 32 धावा देत 1 गडी बाद केला. आता चौथ्या दिवसाच्या खेळाकडे लक्ष असणार आहे. या दिवशी जम्मू काश्मीरची गोलंदाजी चालली तर कर्नाटक पराभवाच्या दरीत ढकलला जाईल.
