AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya: 2023 च्या वनडे वर्ल्ड कपनंतर हार्दिक पांड्या वनडे क्रिकेट सोडेल; रवी शास्त्रींचा सूचक इशारा

खेळाडू आता कोणता फॉरमॅट खेळायचा हे आधीच ठरवत आहेत. हार्दिक पांड्याला टी-20 खेळायचे आहे. त्याच्या डोक्यात ही गोष्ट स्पष्ट आहे, त्याला दुसरे काहीही खेळायची इच्छा नाही. हार्दिक पुढच्या वर्षीच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळेल, पण त्यानंतर तो या फॉरमॅटमधून संन्यास घेईल, असे वक्तव्य रवी शास्त्री यांनी केले आहे.

Hardik Pandya: 2023 च्या वनडे वर्ल्ड कपनंतर हार्दिक पांड्या वनडे क्रिकेट सोडेल; रवी शास्त्रींचा सूचक इशारा
Hardik PandyaImage Credit source: social
| Updated on: Jul 24, 2022 | 11:30 PM
Share

मुंबई : इंग्लंडचा दिग्गज ऑलराऊंडर बेन स्टोक्सने मागच्या आठवड्यात वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. स्टोक्सयाने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. क्रिकेटचे तिन्ही फॉरमॅट खेळणे शारिरिकदृष्ट्या शक्य नसल्याचे कारण देत स्टोक्सने वनडे क्रिकेटला रामराम ठोकला आहे. भविष्यात टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याही (Hardik Pandya) वनडे क्रिकेटमधून संन्यास घेईल असा सूचक इशारा माजी प्रशिक्षक रवी शास्त्री(Ravi Shastri ) यांनी दिला आहे. 2023 च्या वनडे वर्ल्ड(2023 ODI World Cup) कपनंतर हार्दिक पांड्या वनडे क्रिकेट सोडेल, असे भाकीत देखील शास्त्री यांनी केले आहे.

स्टोक्सच्या निवृत्तीमुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली. मात्र, स्टोक्सच्या एका निर्णयामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. वनडे फॉरमॅटच्या भवितव्य अंधारात आले आहे. येत्या काही काळात वनडे क्रिकेटचा अंत होईल, असे मत अनेक दिग्गज खेळाडूंनी व्यक्त केले आहे.

2021 आणि 2022 या दोन वर्षी टी-20 वर्ल्ड कप असल्यामुळे मागच्या दोन्ही वर्षी प्रत्येक टीमने टी-20 फॉरमॅटला महत्त्व दिले. त्यातच क्रिकेट रसिकांमध्ये वनडे क्रिकेटबाबत फारशी उत्सुकता राहिलेली दिसत नाही. स्काय स्पोर्ट्सच्या कॉमेंट्रीमध्ये बोलताना रवी शास्त्री यांनी हार्दिक पांड्याच्या वनडे क्रिकेटच्या भवितव्याबाबत भाष्य केले आहे.

हार्दिकला टी-20 क्रिकेट खेळायचे असून त्याचा पूर्ण फोकस यावरच आहे. यामुळेच हार्दिक इतर प्रकारच्या क्रिकेटवर फार लक्ष देणार नाही, असे शास्त्री म्हणाले.

खेळाडू आता कोणता फॉरमॅट खेळायचा हे आधीच ठरवत आहेत. हार्दिक पांड्याला टी-20 खेळायचे आहे. त्याच्या डोक्यात ही गोष्ट स्पष्ट आहे, त्याला दुसरे काहीही खेळायची इच्छा नाही. हार्दिक पुढच्या वर्षीच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळेल, पण त्यानंतर तो या फॉरमॅटमधून संन्यास घेईल, असे वक्तव्य रवी शास्त्री यांनी केले आहे.

2022 या वर्षात हार्दिक पांड्या जबरदस्त फॉर्ममध्ये

हार्दिक 50 ओव्हरचा वर्ल्डकप खेळेल, कारण तो भारतात होणार आहे. त्यानंतर तो कदाचित तिकडे दिसणार नाही. इतर खेळाडूंच्या बाबतीतही तुम्हाला हेच दिसेल. ते आता फॉरमॅट निवडायला सुरुवात करतील, त्यांना याचा पूर्ण अधिकार आहे, असे शास्त्रींनी सांगितले. मागील काही काळापासून हार्दिक दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर होता. यावर्षी आयपीएलमध्ये हार्दिकच्या नेतृत्वात पहिल्यांदाच खेळणारी गुजरात टायटन्स विजयी झाली. हार्दिकचेही हे कॅप्टन्सीचे पदार्पण होते. आयपीएलनंतर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्येही हार्दिक धमाकेदार कामगिरी करत आहे. एकूणच 2022 या वर्षात हार्दिक पांड्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.