AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गोटी कलटी मार..’ मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममधून रिंकु सिंह बॅट घेऊन पळाला Video

आयपीएल 2026 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 6 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात अजिंक्य रहाणेला क्रॅम्प आल्याने बाहेर गेला. त्यामुळे रिंकु सिंहच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा आली. या सामन्यानंतर एक किस्सा घडला.

'गोटी कलटी मार..' मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममधून रिंकु सिंह बॅट घेऊन पळाला Video
'गोटी कलटी मार..' मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममधून रिंकु सिंह बॅट घेऊन पळाला VideoImage Credit source: Mumbai Indians Twitter
| Updated on: Mar 30, 2026 | 7:17 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजयी सलामी दिली. 221 धावांचं लक्ष्य देऊनही कोलकाता नाईट रायडर्सच्या पदरी निराशा पडली. दुसरीकडे, 221 धावांचा यशस्वी पाठलाग मुंबई इंडियन्सने पहिल्यांदाच केला. या सामन्यानंतर पराभवाचं बरंच विश्लेषण करण्यात आलं. दुसऱ्या डावात 4 षटकानंतर रिंकु सिंहकडे कर्णधारपदाची धुरा आली. त्यावेळी कॅमरून ग्रीनला षटक का दिलं नाही असा प्रश्न विचारला जात होता. त्यावर सामना संपल्यानंतर अजिंक्य रहाणेने स्पष्टीकरण दिलं. असं असताना रिंकु सिंह सामना संपताच मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला. यावेळी त्याने मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंशी चर्चा केली. टीम इंडियातील खेळाडू असल्याने त्याला हा ड्रेसिंग रूम काही नवखा नव्हता. पण या दरम्यान रिंकु सिंह ड्रेसिंग रूममधून बॅट घेऊन गेला. त्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

सामना संपल्यानंतर रिंकु सिंह आणि अंगकृष रघुवंशी मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले. या दरम्यान रघुवंशी एक बॅटने खेळत होता. तेव्हा रिंकु सिंह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मासह इतर खेळाडू उपस्थित होते. त्यानंतर रिंकु सिंह मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममधून निघाला. त्यावेळी सर्व खेळाडू त्याला थांबवत होते आणि बॅट ठेवायला सांगत होते. तेव्हा रिंकु सिंह सांगतो की, माझी बॅट नाही, फिन एलनची बॅट आहे. तेव्हा तिलक वर्मा मजेशीर अंदाजात सांगतो की, इकडे ये आणि दाखव बघू. तेव्हा रिंकु सिंह मागे वळून देखील पाहात नाही आणि पळून जातो.

रिंकु सिंह बॅट घेऊन जात असताना मागे धमाल चित्रपटाच प्रसिद्ध डायलॉगचा आवाज येतो. गोटी कलटी मार.. हे खूपच मजेशीर वाटते. त्यावर तिलक वर्मा बोलतो की, किती बॅट घेणार. मुंबई इंडियन्सने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, अजून किती बॅट घेणार रिंकु भाई..! यापूर्वी रिंकु सिंह विराट कोहलीकडे बॅट मागण्यासाठी गेला होता. तेव्हाही व्हिडीओ असाच व्हायरल झाला होता. आता आयपीएल 2026 स्पर्धा सुरू झाली आहे. तसेच रिंकु सिंह बॅट घेण्याचा प्रकार सुरू झाले आहेत.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.