IPL 2026 : सलग 13 वर्षांचा मुंबईचा पराभवाचा सिलसिला मोडल्यानंतर सचिन तेंडुलकरचा रोहित शर्मा, शार्दुल ठाकूरला खास संदेश
IPL 2026 : मुंबई इंडियन्सने रविवारी आयपीएल 2026 च्या सलामीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवला. मुंबईसाठी हा विजय खूप खास आहेत. कारण मागच्या 13 वर्षांपासून सलामीच्या सामन्यात मुंबईचा पराभव झाला आहे. या विजयानंतर सचिन तेंडुलकरने खास पोस्ट केलीय.

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2026 च्या दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत केलं. केकेआरने विजयासाठी दिलेलं 221 धावांचं अवघड लक्ष्य पाच चेंडू आणि सहाविकेट राखून पार केलं. दोन्ही टीम्सकडून आक्रमक फलंदाजी पहायला मिळाली. केकेआरच्या टॉप ऑर्डरने दमदार फलंदाजी केली. त्यामुळे त्यांना एवढी मोठी धावसंख्या उभारता आली. अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिष रघुवंशी दोघांनी अर्धशतकं फटकावली. त्यांनी केकेआरसाठी मजबूत पाया रचला. संपूर्ण इनिंगमध्ये केकेआरच्या फलंदाजांनी तोच वेग शेवटपर्यंत कायम ठेवला. जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूर या मुंबईच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी केली. पण कोलकाताच्या फलंदाजांनी अनुकूल स्थितीचा फायदा उचलत विजयासाठी जेवढ्या धावा गरजेच्या आहेत, त्यापेक्षा जास्त धावा केल्या.
मॅच सुरु होण्याआधी लिजिंड सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्यासोबत चर्चा करताना दिसला. मुंबई इंडियन्सने एवढ्या मोठ्या लक्ष्याचा एका मजबूत इराद्याने पाठलाग सुरु केला. रोहित शर्मा आणि रायन रिकेलटॉन यांनी तुफानी सुरुवात केली. सुरुवातीपासून त्यांनी केकेआरच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. दोघांनी अवघ्या 71 चेंडूत 148 धावांची भागीदारी केली. त्याने सामना कुठल्या दिशेला जाणार हे निश्चित केलं. या आक्रमक फलंदाजीमुळे आवश्यक धावगतीपेक्षा मुंबईचा रनरेट जास्त होता. धावसंख्या मोठी असली तरी आपण चेस करु शकतो हा विश्वास टीममध्ये निर्माण झाला.
सचिन तेंडुलकर काय म्हणाला?
मॅच संपल्यानंतर सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सच्या टीमचं एक्सवर कौतुक केलं. “डावाची चांगली सुरुवात केल्यास सर्व धावसंख्या सहज चेज होऊ शकतात. रिकलटॉन आणि रोहितच्या फलंदाजीने मुंबईच काम सोपं केलं. विजयाचा पाया रचला. मोठी धावसंख्या असूनही शार्दुलने सुद्धा पहिल्याच सामन्यात चांगली कामगिरी केली. हा चांगला सीजन ठरेल अशी अपेक्षा आहे” असं सचिन तेंडुलकरने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
A good start to the innings makes all scores look comfortably chaseable! Rickelton and Rohit gave MI a lot of breathing room early on and set us up for the win. Solid first outing for Shardul as well, in a high-scoring match.
Looking forward to a great season!💙
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 29, 2026
मुंबईच्या ओपनिंग पार्टनरशिपचं महत्व सचिनने आपल्या टि्वटमधून अधोरेखित केलं. यामुळे स्कोरबोर्डकडे पाहून खेळण्याचा दबाव कमी झाला. मधल्याफळीला मुक्तपणे खेळता आलं. मोठ्या धावसंख्येच्या या सामन्यात शार्दुल ठाकूरने केलेल्या गोलंदाजीचं सुद्धा सचिनने कौतुक केलं.
