सचिन तेंडुलकरनं 14 वर्षापूर्वींच्या दुखापतीविषयी पहिल्यांदा सांगितलं, म्हणाला शोएब अख्तरचा तो बॉल थेट…

सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) तब्बल चौदा वर्षानंतर एका दुखापतीचा खुलासा केला आहे. Sachin Tendulkar Shoaib Akhtar

सचिन तेंडुलकरनं 14 वर्षापूर्वींच्या दुखापतीविषयी पहिल्यांदा सांगितलं, म्हणाला शोएब अख्तरचा तो बॉल थेट...
सचिन तेंडुलकर शोएब अख्तर

नवी दिल्ली: टीम इंडियाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) तब्बल चौदा वर्षानंतर एका दुखापतीचा खुलासा केला आहे. पाकिस्तानची टीम 2007 मध्ये भारताच्या दौऱ्यावर होती. त्यावेळी एका वनडे मॅचमध्ये वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) टाकलेला एक बॉल सचिनच्या बरगडीवर आदळला होता. यामुळे सचिनला बराचकाळ वेदना सहन कराव्या लागल्या. पाकिस्तानच्या मालिकेनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली. तिथेही सचिनला बरगडीला झालेल्या दुखापतीमुळे पाठीवर झोपण्यास त्रास होत होता. (Sachin Tendulkar revealed about ribs injury after fourteen years caused by Shoaib Akhtar ball hit on his ribs)

14 वर्षांपूर्वीची दुखापत

‘अन अ‌ॅकडमी’ च्या एका सेशनमध्ये सचिन तेंडुलकरने या दुखापतीविषयी प्रथमच माहिती दिली,. ‘2007 मध्ये एका मॅचमध्ये बरगडीवर बॉल लागला होता. त्यावेळी आम्ही भारतात पाकिस्तानविरुद्ध मॅच खेळत होतो. पहिल्याच ओव्हरमध्ये शोएब अख्तरनं टाकलेला बॉल बरगडीवर लागला. त्यानंतर खूप वेदना झाल्या, पुढील दोन महिने व्यवस्थित झोपता येत नव्हतं. मात्र, तरीदेखील मी खेळत राहिलो. त्यानंतर स्वत: साठी चेस्ट गार्ड बनवलं. दुखापत होऊनही पुढील चार मॅच आणि कसोटी मालिका खेळली, असंही सचिननं सांगतिलं.

दुखापत झाल्याचं कसं समजलं?

2007 मध्ये पाकिस्तान विरुद्ध तीन टेस्ट आणि पाच वनडे सामन्यांची सीरीज झाल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली. या सीरीजमध्ये श्रीलंकेची टीम सहभागी होती. सचिनला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कमरेला दुखापत झाली होती. यांतर भारतात आल्यानंतर सचिननं संपूर्ण शरीराची तपासणी केली यामध्ये बरगडीच्या दुखापती बाबत डॉक्टरांनी सांगितलं.

मिशन आँक्सिजन इंडीयाला 1 कोटी रुपयांची मदत

सचिन तेंडूलकरने मिशन आँक्सिजन इंडीयाला 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. दिल्लीतील 250 उद्योजक तरूणांनी सुरू केलेल्या या मोहिमेत सचिनने सहभाग घेतला आहे. सचिन तेंडुलकरप्रमाणे इतर काही भारतीय आणि परदेशी खेळाडूंनी यापूर्वीच आपआपल्या परीने मदत केली आहे. त्यामध्ये रोहित शर्मा, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, महिला क्रिकेटपटू मिताली राज हिनेदेखील कोरोनाशी लढणाऱ्या भारताला मदत केली आहे.

संबंधित बातम्या:

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सचिन तेंडुलकर मैदानात, ‘मिशन ऑक्सिजन इंडियाला’ मदत, ‘इतकी’ रक्कम दिली

Sachin Tendulkar : सचिनचा नवा अवतार, पांढरी दाढी, वाढलेले केस; सोशल मीडियावर नवीन लूक व्हायरल!

(Sachin Tendulkar revealed about ribs injury after fourteen years caused by Shoaib Akhtar ball hit on his ribs)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI