AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA World Cup 2022 : भारतीय संघाची विजयी सलामी, बांग्लादेशला नमवत चढली पहिली पायरी

सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) केलेल्या दोन गोल्सच्या जोरावर भारताने बांग्लादेशला 2-0 ने पराभूत केले. ज्यामुळे फीफा विश्वचषक 2022 च्या क्वॉलीफायर्समध्ये पहिला विजय भारताच्या नावावर झाला आहे.

FIFA World Cup 2022 : भारतीय संघाची विजयी सलामी, बांग्लादेशला नमवत चढली पहिली पायरी
भारत विरुद्ध बांग्लादेश
| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 5:14 PM
Share

कतार : भारतीय संघाने फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) च्या क्वॉलीफायर सामन्यात विजय मिळवत स्पर्धा सुरु होण्याआधी यशाची पहिली पायरी गाठली आहे. भारताने बांग्लादेशवर (India vs Bangladesh) 2-0 च्या फरकाने विजय मिळवत सामना आपल्या नावे केला. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार छेत्रीने केलेले दोन गोल निर्णायक ठरले. या विजयामुळे भारताने २०२३च्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेच्या तिसऱ्या पात्रता फेरीमधील स्थान ही बळकट केले आहे. (Sunil Chetri Goal Helps India To Win Against Bangladesh In Fifa World Cup 2022 First Qualifier)

कसा झाला सामना

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील या सामन्यात भारत सुरुवातीपासूनच बांग्लादेशवर एकामागोमाग एक चढाया करत होता. अशामध्ये पहिल्या सत्रात दोन्ही संघाना एकही गोल करता न आल्याने स्कोर 0-0 च होता. त्यानंतर सेंकड हाल्फमध्येही दोन्ही संघाना गोल करता येत नव्हता. अखेर सामना संपण्यासाठी 11 मिनिटं शिल्लक असताना आशिक कुरुनियानने डावीकडून दिलेल्या क्रॉसच्या जोरावर कर्णधार सुनील छेत्रीने उत्कृष्ट हेडरद्वारे पहिला गोल नोंदवला आणि सामन्यात भारताना 1-0 ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर एक्स्ट्रा टाईममध्ये 92 व्या मिनिटाला उजवीकडून सुरेश सिंगने दिलेल्या पासवर छेत्रीने आणखी एक गोल झळकावत सामना 2-0 च्या फरकाने भारताला जिंकवून दिला.

छेत्रीने मेस्सीला पछाडले

या सामन्यांतील दोन गोल्सच्या जोरावर आंतरराष्ट्रीय सामन्यांत केलेल्या छेत्रीच्या गोल्सची संख्या 74 झाली. ज्यामुळे छेत्री मेस्सीला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. मेस्सीच्या नावावर सध्या 72 गोल्स असून पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) 103 गोल्ससह प्रथमस्थानी आहे. या रेकॉर्डसोबतच छेत्रीने आणखी एक विशेष विक्रम आपल्या नावे केला आहे. तो पहिला भारतीय खेळाडू बनला आहे ज्याने तिन्ही दशकात देशासाठी गोल लगावले आहेत. त्याने 2004 साली भारतीय संघात पदार्पण केलं तेव्हापासून तो आतापर्यंत देशासाठी खेळत असून प्रत्येक सामन्यात महत्त्वाची कामगिरी पार पाडतो.

हे ही वाचा –

भारतीय फुटबॉलपटूची कमाल, गोल्समध्ये मेस्सीला मागे टाकलं

तिन्ही लीगमध्ये रोनाल्डोचाच डंका! इंग्लंड, स्पेन गाजवल्यानंतर आता इटलीतही रोनाल्डोची यशस्वी वाटचाल

देशाला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी 39 वर्षीय खेळाडू मैदानात, निवृत्तीच्या 5 वर्षांनी पुनरागमन

(Sunil Chetri Goal Helps India To Win Against Bangladesh In Fifa World Cup 2022 First Qualifier)

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.