IND vs AUS : पहिल्या कसोटी सामन्यात रोहित-इशांतला संधी मिळणं अवघड? कोच रवी शास्त्रींनी सांगितलं कारण

रोहित आणि इशांत शर्मा या दोन्ही खेळाडूंची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे. हे दोन्ही खेळाडू बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) फिटनेस ट्रेनिंग घेत आहेत.

IND vs AUS : पहिल्या कसोटी सामन्यात रोहित-इशांतला संधी मिळणं अवघड? कोच रवी शास्त्रींनी सांगितलं कारण
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 8:15 AM

सिडनी : हिटमॅन रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखापतीमुळे आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून (India tour of Austrellia 2020) वगळले होते. त्यामुळे त्याचे चाहते कमालीचे नाराज झाले होते. मात्र दुसरीकडे दुखापतग्रस्त असूनदेखील तो आयपीलमध्ये (IPL 2020) मुंबईच्या (Mumbai Indians) संघाकडून मैदानात उतरला. आयपीएलच्या फायनलमध्ये अर्धशतक ठोकून त्याने त्याचा फॉर्मही दाखवला. यावरुन अनेकांनी बीसीसीआयवर (BCCI) टीकेची झोड उठवली. खेळाडूंचे मेडिकल रिपोर्ट्स आल्यानंतर मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात काही बदल करण्यात आले. त्यामध्ये रोहित शर्माला कसोटी संघात स्थान देण्यात आलं. (Team India coach Ravi Shastri on Rohit Sharma and Ishant sharma injury; It’s hard to part of first test match)

रोहितप्रमाणेच टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज इशांत शर्मादेखील सध्या दुखापतीतून सावरतोय. दोघांचीही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे. हे दोन्ही खेळाडू बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) फिटनेस ट्रेनिंग घेत आहेत. परंतु या खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळण्यासाठी पुढील चार ते पाच दिवसात भारतातून ऑस्ट्रेलियाला रवाना व्हावे लागेल. परंतु त्यांना त्यांची फिटनेस ट्रेनिंग पूर्ण करायला अजून किती वेळ लागेल, हे सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू पहिल्या कसोटी सामन्यात खेळतील किंवा नाही, याबाबत संभ्रम आहे.

टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री याबाबत म्हणाले की, कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ऑस्ट्रेलियन सरकारने बनवलेले क्वारन्टिनसंबंधित नियम आणि सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही खेळाडूंना लवकरात लवकर ऑस्ट्रेलियात दाखल व्हावे लागेल. त्यांना जास्त दिवस भारतात राहावे लागले तर आपल्या अडचणी वाढू शकतात. रोहित शर्माची NCA मध्ये जोरदार फिटनेस ट्रेनिंग सुरु आहे, असे शास्त्री यांनी ईएसपीएन-क्रिकइन्फोशी बोलत असताना सांगितले.

शात्री म्हणाले की, त्याला (रोहितला) जास्त दिवस एनसीएमध्ये थांबावं लागलं तर परिस्थिती आपल्या हातात राहणार नाही. ट्रेनिंग पूर्ण करुन तो ऑस्ट्रेलियात येणार. त्यानंतर तो क्वारन्टिन कालावधी पूर्ण करणार, आणि मग तो कसोटी मालिका खेळण्यासाठी उपलब्ध होईल. असा परिस्थितीत काहिही सांगणं अवघड आहे.

इशांतबद्दल बोलताना शास्त्री म्हणाले की, त्याची परिस्थितीदेखील रोहितसारखीच आहे. अजून कोणालाही माहीत नाही के हे दोघे ऑस्ट्रेलियाला येण्यासाठी कधी निघतील. दोघांनाही पहिल्या कसोटी सामन्यात खेळायचे असेल तर पुढील 4-5 दिवसात त्यांना विमान पकडावं लागेल.

कोणत्याही क्रमांकावर बॅटिंगसाठी तयार : रोहित शर्मा

रोहित शर्मा कसोटी मालिकेच्या दृष्टीने एनसीएमध्ये जोरदार सराव करतोय. “मी कसोटी मालिकेत कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार आहे”, अशी प्रतिक्रिया रोहित शर्माने पीटीआयला दिली आहे. रोहितने मागील 5 कसोटीत टीम इंडियासाठी सलामी दिली आहे.

रोहित म्हणाला की, “टीम मॅनेजमेंट मला ज्या क्रमांकवर खेळवण्यात तयार आहे, त्या क्रमांकावर मी खेळेन. टीम मॅनेजमेंट माझ्या सलामीवीरच्या भूमिकेत बदल करणार की नाही, याबाबत मला माहिती नाही”, असं रोहितने म्हटलं.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या

India vs Australia 2020 | ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाने मोठ्या फरकाने जिंकलेले 3 एकदिवसीय सामने

India vs Australia 2020 | वेगवान 12 हजारी विराट, शंभर नंबरी चहल, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहली-युजवेंद्रला विक्रमाची संधी

(Team India coach Ravi Shastri on Rohit Sharma and Ishant sharma injury; It’s hard to part of first test match)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.