नितीन मेनन पुन्हा एकदा कोपला, त्या एका निर्णयामुळे हुकलं असतं अर्धशतक Watch Video

विराट कोहलीने वर्षभरानंतर कसोटीत अर्धशतक झळकावलं आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने जवळपास 10 वर्षांनी अर्धशतक ठोकलं आहे. मात्र नितीन मेनन यांच्या एका निर्णयाने अर्धशतकाला खिळ बसली असती.

नितीन मेनन पुन्हा एकदा कोपला, त्या एका निर्णयामुळे हुकलं असतं अर्धशतक Watch Video
अर्धशतकाचा निर्णय पंच नितीन मेननकडे आणि विराट कोहली हसला, काय झालं पाहा नेमकंImage Credit source: Video Screenshot
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 7:29 PM

मुंबई : विराट कोहलीचे चाहते आणि पंच नितीन मेनन यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नितीन मेननच्या एका चुकीच्या निर्णयामुळे दिल्ली कसोटीत कोहलीला बाद होत तंबूत परतावं लागलं. त्यामुळे दीर्घ काळानंतर मोठी धावसंख्या उभारण्याचं विराट कोहलीचं स्वप्न हुकलं होतं. चौथ्या कसोटी सामन्यातही नितीन मेनन यांच्या एका निर्णयाने चाहते चांगलेच संतापले आहेत. तिसऱ्या दिवशी विराट कोहली 48 धावांवर असताना नाथन लायनच्या गोलंदाजीवर चेंडू मारला आणि दोन धावा घेत अर्धशतक पूर्ण केलं. पण या दोन धावांवरून मैदानात चांगलाच गोंधळ निर्माण झाला.

मैदानात उभ्या असलेल्या नितीन मेनन या पंचाला दोन धावांपैकी एक धाव शॉर्ट असल्याची शंका आली. त्यानंतर धाव शॉर्ट आहे की नाही हे तपासण्यासाठी टीव्ही पंचांकडे दाद मागितली. टीव्ही पंचांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर धाव शॉर्ट नसल्याचं जाहीर केलं आणि विराट कोहली अर्धशतक झाल्याची बॅट झळकावली. मात्र विराटची धाव तपासण्याचं आवाहन हे ऑस्ट्रेलियाकडून करण्यात आलं होतं की मेनन यांनी हा कॉल घेतला हे स्पष्ट नाही.

तिसरा दिवस अखेर विराट कोहली 128 चेंडूत 59 धावा करून नाबाद आहे. पंच नितीन मेनन यांच्या या निर्णयानंतर विराट कोहलीच्या चाहत्यांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. काही जणांनी तर विराट कोहलीचा शत्रू असल्याची जहरी टीका केली आहे. एका चाहत्याने लिहिलं आहे की, “मेनन साहेब विराट कोहलीला आउट करण्यासाठी आतापासूनच रणनिती आखत आहेत.”

तिसऱ्या दिवशीचा खेळ

तिसरा दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली नाबाद 59 आणि रविंद्र जडेजा नाबाद 16 धावांवर खेळत आहे. भारताने 3 गडी गमवून 289 धावा केल्या आहेत. अजूनही ऑस्ट्रेलियाकडे 191 धावांची आघाडी आहे. त्यामुळे चौथ्या दिवशी विराट कोहली आणि रविंद्र जडेजाला सावध खेळी करावी लागणार आहे. चौथ्या दिवशीचा खेळ लांबला तर हा सामना अनिर्णित ठरेल असंच चित्र आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.

Non Stop LIVE Update
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.