AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli Retirement : हा निर्णय कठीण पण… कसोटीतून निवृत्त होताना काय म्हणाला विराट ?

भारतासाठी 14 वर्ष कसोटी क्रिकेट खेळताना विराटने 123 टेस्ट मॅचेस खेळत 210 इनिंग्समध्ये 46.85 च्या रनरेटने 9230 धावा केल्या. 30 शतकं आणि 31 अर्धशतक झळकावणाऱ्या विराटची, 254 (नाबाद) ही सर्वोच्च धावसंख्या आहे

Virat Kohli Retirement : हा निर्णय कठीण पण... कसोटीतून निवृत्त होताना काय म्हणाला विराट ?
निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना विराटची भावनिक पोस्ट Image Credit source: social media
| Updated on: May 12, 2025 | 4:32 PM
Share

Virat Kohli Retirement : भारताचा माजी कर्णधार आणि नामवंत फलंदाज विराट कोहलीने याने कसोटी क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात बीसीसीआयशी चर्चा केल्यावरच विराटने निवृत्तीचे संकेत दिले होते. मात्र अखेर आज कसोटीतून रिटायर होण्याच्या निर्णयाची त्याने अधिकृत घोषणा केली. सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहीत विराटने त्याच्या भावना व्यक्त केल्या आणि 14 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला ‘अलविदा’ केलं.

भारतासाठी 14 वर्ष कसोटी क्रिकेट खेळताना विराटने 123 टेस्ट मॅचेस खेळत 210 इनिंग्समध्ये 46.85 च्या रनरेटने 9230 धावा केल्या. 30 शतकं आणि 31 अर्धशतक झळकावणाऱ्या विराटची, 254 (नाबाद) ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर हरवले होते आणि टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही पोहोचला होता.

निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना विराटची भावनिक पोस्ट

विराट म्हणाला,” 14 वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा टेस्ट क्रिकेटसाठी ब्लॅगी ब्लू रंगाचा ड्रेस घातला होता. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर या (कसोटी क्रिकेट) फॉरमॅटमध्ये माझा प्रवास असा असेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. या फॉरमॅटने माझी परीक्षा घेतली, मला जोखलं, मला घडवलं आणि आयुष्यभर उपयोगी असे धडेही शिकवले. ” असं विराटने लिहीलं.

” पांढऱ्या जर्सीत खेळणं हे माझ्यासाठी वैयक्तिक पातळीवर खूप खास होतं. मोठ-मोठे दिवस, आणि असे काही छोटे क्षण जे कोणी पाहत नाही पण ते कायम तुमच्यासोबत राहतात ” असंही विराटने पोस्टमध्ये नमूद केलं.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

कोहली ने पोस्टमध्ये लिहीलं, ” या फॉरमॅटमधून निवृत्ती घेणं माझ्यासाठी निश्चितच सोपं नाही, पण मला हे (निर्णय)योग्य वाटतंय, हीच योग्य वेळ आहे. माझ्याकडे जे होतं ते सगळं मी ( कसोटी क्रिकेटला) दिलं आणि माझ्या अपेक्षेपेक्षा मला खूप जास्त परत मिळालं आहे. कृतज्ञतेने भरलेल्या मनाने मी निवृत्त होत आहे. हा खेळ, मी ज्या-ज्या लोकांसोबत मैदान शेअर केलं ते आणि या प्रवासात वाटेत दिसलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी कृतज्ञता व्यक्त करतो ” असंही विराटने लिहीलं.

सर्वात शेवटी विराट म्हणाला, ” माझ्या कसोटी करिअरकडे मी नेहमी हसतमुखाने पाहीन.”

विराटच्या या पोस्टवर लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला असून अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

रोहित पाठापोठ विराट निवृत्त

गेल्या आठवड्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. त्याच्यापाठोपाठ विराटनेही कसोटीतून निवृत्तीचे संकेत दिले, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याशी चर्चा करत मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. निवृत्तीचा निर्णय घेण्यापासून त्याला रोखण्याचा प्रयत्नही केला, मात्र विराट त्याच्या निर्णयावर ठाम राहिला आणि अखेर आज त्याने निवृत्ती जाहीर केली.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.