सॅल्युटच्या स्टाईलने जगभरात चर्चेत असणाऱ्या खेळाडूचा धोनीला सलाम

2019 च्या विश्वचषकात विकेट घेतल्यानंतरचा आनंद तो असाच सॅल्युट करुन साजरा करताना क्रिकेटरसिकांनी त्याला पाहिले. याच शेल्डन कॉट्रेलने भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या सैन्यात काम करण्याच्या निर्णयाला सलाम केला आहे.

सॅल्युटच्या स्टाईलने जगभरात चर्चेत असणाऱ्या खेळाडूचा धोनीला सलाम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jul 29, 2019 | 10:41 PM

मुंबई : वेस्ट इंडिजचा गोलंदाज शेल्डन कॉट्रेल आपल्या सॅल्युट स्टाईलसाठी चांगलाच प्रसिद्ध आहे. 2019 च्या विश्वचषकातही विकेट घेतल्यानंतरचा आनंद तो असाच सॅल्युट करुन साजरा करताना क्रिकेटरसिकांनी त्याला पाहिले. याच शेल्डन कॉट्रेलने भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या सैन्यात काम करण्याच्या निर्णयाला सलाम केला आहे.

कॅप्टन कुल धोनीने त्याच्या निवृत्तीवरुन वाद सुरु असतानाच 2 महिन्यांची सुट्टी घेत सैन्यात काम करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयावर देशभरातून स्वागत करणाऱ्या आणि चिकित्सा करणाऱ्या अशा दोन्ही प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, क्रिकेटविश्वात या निर्णयाचे कौतुक होताना दिसत आहे. वेस्ट इंडिजचा गोलंदाज शेल्डन कॉट्रेलने धोनीच्या या निर्णयावर त्याला सलाम केला.


कॉट्रेल म्हणाला, “एस. एस. धोनी हा व्यक्ती क्रिकेटच्या मैदानावर प्रेरणादायी आहेच, मात्र तो एक देशभक्त देखील आहे. तो आपल्या देशाला कर्तव्यापलिकडं जाऊन देतो. मी मागील काही आठवड्यापासून जमैकामधील घरी माझ्या मुलांसोबत आहे. हा वेळ मिळाल्यानेच माझ्या मनात हा विचार आला.”

कॉट्रेलने आपल्या या ट्विटमध्ये विश्वचषकावरुन घरी आल्याचे सांगतानाच एक खेळाडू म्हणून आणि पालक म्हणून दुहेरी जबाबदारीत काम करण्याविषयी त्याचे विचार व्यक्त केले. तसेच त्याचा संदर्भ देत धोनी या पलिकडं जाऊन देशाची सेवा करत असल्याचे गौरवोद्गार काढले.

कॉट्रेलने धोनीचा एक व्हिडीओ देखील ट्विटरवर शेअर केला आणि आपल्या चाहत्यांना हा व्हिडीओ पाहण्याचे आवाहन केले. हा व्हिडीओ धोनीला 2018 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला तेव्हाचा आहे. यात धोनी भारतीय सैन्याच्या गणवेशात दिसत आहे. तसेच राष्ट्रपतींकडून पुरस्कार स्वीकारायला जाताना तो सैन्यात करण्यात येणारी परेड करत जातो. या व्हिडीओत त्याची पत्नी साक्षी काहीशी भावूक झालेली देखील दिसते.


कॉट्रेल म्हणाला, “मी माझ्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत एक व्हिडीओ शेअर करत आहे. कारण या सर्वांना माहिती आहे मला सन्मानाबद्दल काय वाटतं. मात्र, या व्हिडीओतील पती-पत्नीमधील तो क्षण जोडीदार म्हणून एकमेकांप्रति आणि देशाप्रतिचं प्रेरणादायी प्रेम दाखवतो. हा व्हिडीओ पाहा आणि आनंद घ्या.”

महेंद्रसिंग धोनी भारताच्या पॅरामिलिटरीच्या 106 व्या बटालियनचा भाग आहे. त्याच्या खेळातील कामगिरीसाठी 2011 मध्ये त्याला सैन्याची मानद लेफ्टनंट कर्नल ही उपाधी देण्यात आली आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें