गोलंदाजांचा भेदक मारा, अवघ्या 10 ओव्हरनंतर कसोटी सामना संपला, स्टेडियमवर 1 वर्षांची बंदी

वेस्टइंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात हा सामना खेळवण्यात आला होता.

गोलंदाजांचा भेदक मारा, अवघ्या 10 ओव्हरनंतर कसोटी सामना संपला, स्टेडियमवर 1 वर्षांची बंदी
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 12:16 PM

टेस्ट मॅच (Test Match) साधारणपणे 5 दिवस खेळली जाते. पण अवघ्या 10 ओव्हरनंतर कसोटी मॅच (Cricket) संपल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का, अशी घटना क्रिकेट इतिहासात आजपासून काही वर्षांपूर्वी घडली होती. या घटनेबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. गोष्ट आहे आजपासून बरोबर 22 वर्षांपूर्वीची. 29 जानेवारी-2 फेब्रुवारीदरम्यान वेस्टइंडिज विरुद्ध इंग्लंड (West Indies vs England) या उभयसंघामध्ये हा सामना खेळवण्यात आला होता. सबिना पार्क (Sabina Park) येथे हा सामना आयोजित करण्यात आला. टॉससाठी दोन्ही संघाचे कर्णधार मैदानात आले. इंग्‍लंडचा कर्णधार माइक अर्थटन आणि विंडीजचा कॅप्टन ब्रायन लारा टॉससाठी आले. नाणेफेकीचा कळ इंग्लंडच्या बाजूने लागला. इंग्लंडने फलंदाजीचा निर्णय घेतला. (west indies vs england test match abandoned in sabina park)

कॅप्टन अर्थटन आणि अॅलक स्टीवर्ट ही सलामी जोडी मैदानात आली. दोन्ही सलामीवीर बॅटिंगसाठी सज्ज होते. वेस्ट इंडिजचे गोलंदाज आक्रमणासाठी तयार होते. सामन्याला सुरुवात झाली. कर्टनी वॉल्शने माईक अर्थटनला 2 धावांवर आऊट केलं. मार्क बुचरही पहिल्या चेंडूवर आऊट झाला. नासिर हुसेनही 1 धाव करुन तंबूत परतला. वेस्ट इंडिजच्या या 7 फूटी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडने  3 विकेट्स गमावल्या. यामुळे इंग्लंडची 7.2 ओव्हरमध्ये 3 बाद 9 अशी बिकट स्थिती झाली. त्यानंतर पुढे आणखी 3 ओव्हर खेळण्यात आल्या. वॉल्शसह कर्टली एंब्रोसने 1 विकेट घेतली.

सामन्यातील पहिल्या 10 षटकांचा खेळ पूर्ण झाला होता. 11 व्या ओव्हमधील पहिला चेंडू टाकून झाला. मात्र त्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांसह क्रिकेट विश्ववात आश्चर्य व्यक्त करण्यात आले. नक्की सामना रद्द का करण्यात आला, असा प्रश्न सर्वांना पडला.

जेव्हा सामन्याचा 61 वा चेंडू टाकला गेला तेव्हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण मैदानाच्या आऊटफिल्डवर रेती पसरली. यामुळे वेस्ट इंडिजला गोलंदाजी करताना अडथळा येत होता. यामुळे हा सामना अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या अशा परिस्थितीमुळे या मैदानात पुढील 12 महिने कोणत्याही सामन्याचे आयोजन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजे वर्षभरासाठी या मैदानावर बंदी घालण्यात आली.

संबंधित बातम्या :

India vs England 2nd Test, 2nd Day Live | पहिल्या सत्रावर टीम इंडियाचं वर्चस्व, इंग्लंडच्या 4 बाद 39 धावा

India vs England 2nd Test 1st Day | हिटमॅन रोहित शर्माचा अनोखा कारनामा, ठरला पहिलाच भारतीय

(west indies vs england test match abandoned in sabina park)

Non Stop LIVE Update
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.