Virat Kohli : इशारो-इशारोंमे बाते.. RCB फायनलमध्ये पोहोचताच विराटने अनुष्काला काय सांगितलं ? Video पहाच
आयपीएल 2025 आता शेवटच्या टप्प्यात असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने क्वॉलिफायर-1 मध्ये पंजाब किंग्जचा पराभव केला आणि चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर, विराट कोहलीने त्याची पत्नी अनुष्का शर्माला पाहून एक खास इशारा केला. आरसीबी फयानलमध्ये गेल्याने अनुष्काही खूप खुश दिसली. तिची रिॲक्शन व्हायरल झाली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने क्वालिफायर-1 मध्ये पंजाब किंग्जचा 8 विकेट्सने पराभव करत आणि अंतिम फेरीत धमाकेदार प्रवेश केला. आरसीबीने चौथ्यांदा आयपीएलची अंतिम फेरीत गाठली आहे. याआधी तीन वेळा या संघाने चॅम्पियन होण्याची संधी गमावली आहे. पण यावेळी तरी आरसीबी आणि विराट कोहलीची 18 वर्षांची प्रतीक्षा संपेल का याकडेच सर्वांचे लक्ष लागलं आहे. कारण आयपीएल 2025 मध्ये, बंगळुरूचा संघ अतिशय वेगळ्या पण दमदार शैलीत खेळत आहे आणि पहिल्यांदाच त्यांच्या जिंकण्याची इतकी भूकही दिसत्ये.
त्यामुळेच तब्बल 9 वर्षांनी आरसीबी चा संघ ट्रॉफीच्या इतक्या जवळ पोहोचला आहे, म्हणून खेळाडूंपासून ते संघाच्यचाहत्यांपर्यंत सर्वजण भावनिक झाल्याचं दिसून आलं. काल आरसीबीच संघ अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर विराट कोहलीही खूप आनंदी होता. त्याने त्याची पत्नी अनुष्का शर्माला एक इशारा केला, तोही खूपच चर्चेत आहे. (विजयापासून) फक्त 1 पाऊल दूर असं म्हणतं त्याने 1 बोटं दाखवलं, ते पाहून अनुष्काही खूप आनंदी दिसत होती. आता दोघांचीही रिॲक्शन सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
RCB च्या प्रत्येक मॅचमध्ये अनुष्काच्या शेजारी बसणारी ती सुंदर महिला आहे तरी कोण ?
इशारो-इशारोंमे बाते
आयपीएलच्या पहिल्या पर्वातील आरसीबीच्या पहिल्या सामन्यापासून ते आतापर्यंत विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे जो संघासोबत राहिला आहे. तो सोडला तर संघात अनेक खेळाडू आणि प्रशिक्षक आले आणि गेले देखील, पण कोहली नेहमीच आरसीबीसोबत राहिला. त्यामुळे, फायनल जिंकून आरसीबीचा संघ आयपीएल चॅम्पियन होण्यासाठी विराटनेच सर्वात जास्त वाट पाहिली आहे. म्हणूनच काल, (29 मे) पंजाबला हरवून जेव्हा आरसीबीची संघ ट्रॉफीच्या आणखी जवळ आला, तेव्हा विराटने आपला आनंद उघडपणे व्यक्त केला. अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर, तो त्याची पत्नी अनुष्काला 1 बोट दाखवत काहीतरी बोलताना दिसला. ‘आणखी फक्त एक खेळ बाकी आहे, एक पाऊल (विजयापासू) दूर आहे’ असे म्हणत होता, असं त्याच्या हावभावांवरून वाटत होतं.
— The Game Changer (@TheGame_26) May 29, 2025
या हंगामात विराट कोहली आरसीबीचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. मात्र, कालच्या सामन्यात, अर्थात क्वॉलिफायर -1 मध्ये पंजाबविरुद्ध तो फार चांगली खेळी करू शकला नाही. विराट फक्त 12 धावा करून बाद झाला. पण सामन्यात क्षेत्ररक्षण करताना तो बराच चपळ होता. कोहलीने अनेक वेळा फील्डिंग सेट केली आणि बॉलर्सशी बोलतानाही तो दिसला.
गोलंदाजांमुळे विजय
काल पंजाबविरुद्धच्या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी घातक बॉलिंग केली. त्यांनी पंजाबच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले आणि त्यांना फक्त 14.1 ओव्हर्समध्ये 101 धावांवर गुंडाळले. जोश हेझलवूडने 21 धावांत 3, भुवनेश्वर कुमारने 17 धावांत 1 तर यश दयालने 26 धावांत 2बळी घेतले. तर लेग स्पिनर सुयश शर्माने 17 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. नंतर फलंदाजी करताना आरसीबीने हे सोप लक्ष्य फक्त 10 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केले.
