चाहता भेटायला आला, धोनी पळायला लागला, मैदानातच पकडापकडी

नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वन डे सामन्यात भारताने सर्वबाद 250 धावा काढल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर आता विजयासाठी 251 धावांचं आव्हान आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या धडाकेबाज 116 धावांच्या जोरावर भारताला इथवर मजल मारता आली. हे कोहलीचं 40 वं शतक आहे.  दुसरा वन डे सामना आज नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होत आहे. …

चाहता भेटायला आला, धोनी पळायला लागला, मैदानातच पकडापकडी

नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वन डे सामन्यात भारताने सर्वबाद 250 धावा काढल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर आता विजयासाठी 251 धावांचं आव्हान आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या धडाकेबाज 116 धावांच्या जोरावर भारताला इथवर मजल मारता आली. हे कोहलीचं 40 वं शतक आहे.  दुसरा वन डे सामना आज नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होत आहे. या सामन्यात टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. भारताने 48.2 षटकात 250 धावा केल्या.

या सामन्यात कोहलीच्या धडाकेबाज खेळीने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. मात्र, या सामन्यात धोनीने  सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मध्यंतरानंतर जेव्हा भारतीय संघ मैदानात आला तेव्हा धोनीचा एक चाहता त्याची भेट घेण्यासाठी थेट मैदानात उतरला. मात्र, धोनी नेहमीप्रमाणे आपल्या चाहत्याला न भेटता तो त्याच्यापासून पळू लागला. यानंतर धोनी आणि त्याच्या चाहत्यामध्ये चक्क पकडापकडीचा डाव रंगला. यावेळी स्टेडियममधील सर्वांचं लक्ष धोनी आणि त्याच्या चाहत्याच्या पकडापकडीवर होतं. अखेर धोनी स्टंपजवळ जाऊन थांबला आणि त्याने चाहत्याला मिठी मारत त्याची भेट घेतली. तर चाहत्याने धोनीच्या पायाही पडला.

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेला भारताचा सलामीवीर रोहित शर्मा शून्यावर बाद झाल्याने भारताला जोरदार धक्का बसला. त्यानंतर शिखर धवनही 21 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत आली. अशावेळी कर्णधार कोहलीने अंबाती रायुडूच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रायुडू 18 धावांवर पायचित झाला. यांनतर विजय शंकर आणि विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. मात्र 46 धावांवर विजय धावबाद झाला. त्यानंतर केदार जाधव (11) आणि महेंद्रसिंह धोनी 0 या दोघांना झाम्पाने सलग दोन चेंडूवर बाद करुन भारताला बॅकफूटवर ढकललं.  यानंतर कोहलीने येईल त्या फलंदाजाला साथीला घेऊन आपलं शतक पूर्ण केलं.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने खणखीत शतक झळकावलं. कोहलीने एकाकी खिंड लढवत भारताला सव्वा दोनशेचा टप्पा ओलांडून दिला. दुसऱ्या बाजूने भक्कम साथ मिळत नसताना, कोहलीने टिच्चून फलंदाजी करुन 107 चेंडूत शतक पूर्ण केलं. कोहलीचं हे वन डेतील 40 वं शतक आहे.

पाहा व्हिडीओ :

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *