पीयुष चावलाला मुंबई इंडियन्सने का खरेदी केलं? रोहित शर्माने सांगितली ‘राज की बात’!

पीयुषच्या मार्गदर्शनाचा मुंबईच्या (Mumbai Indians) संघातील युवा स्पिनर्सला फायदा होईल, त्याचसाठी त्याला मुंबईच्या संघात सामिल करुन घेतला आहे, असं मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सांगितलं.

पीयुष चावलाला मुंबई इंडियन्सने का खरेदी केलं? रोहित शर्माने सांगितली 'राज की बात'!
रोहित शर्मा आणि पीयुष चावला
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 7:06 PM

मुंबई :  फिरकीपटू पीयुष चावलाला (Piyush Chawla) दबावात खेळण्याचा अनुभव आहे. त्याने अनेक मॅचेस दबावातून बाहेर काढत संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याचा अनुभव मोठा आहे. त्याच्या मार्गदर्शनाचा मुंबईच्या (Mumbai Indians) संघातील युवा स्पिनर्सला फायदा होईल, त्याचसाठी त्याला मुंबईच्या संघात सामिल करुन घेतला आहे, असं मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सांगितलं. (Why Mumbai Indians purches Piyush Chawla Rohit Sharma IPL 2021)

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सने 32 वर्षीय पीयुष चावल याला यंदाच्या लिलावात संघात सामिल करुन घेतलं आहे. मुंबई संघात फलंदाजांचा भरणा आहे. तसंच वेगवान गोलंदाजांची धारही आहे. पीयुष चावलाच्या संघात सामिल होण्याने मुंबईची फिरकीही आता मजबूत झाली आहे. पीयुषच्या साथीला राहुल चहर असणार आहे.

रोहितकडून पीयुषची तारीफ

मी पीयुषला गेली 10 ते 12 वर्ष झालं ओळखतो. त्याला खेळ मला माहिती आहे. अंडर 19 पासून आम्ही एकमेकांसोबत खेळतो. तो खूप आक्रमक आणि अटॅकिंग बोलर आहे. त्याचा समावेश मुंबईच्या संघात व्हावा, यासाठी संघ प्रशासन प्रयत्नशील होतं, असं रोहित शर्मा म्हणाला.

पीयुष विकेट टेकर बोलर, मुंबईला फायदा होईल

पीयुष मुंबईच्या संघात सामिल झाल्याने मुंबई इंडियन्सला त्याचा फायदाच होणार आहे. सर्वाधिक विकेट्स घेण्याऱ्या गोलंदाजांच्या यादीत पीयुषचं नाव आहे. साजहिकच त्याचा फायदा मुंबईला होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो विकेट टेकर बोलर आहे. संघाला पाहिजे तेव्हा तो विकेट्स मिळवून देतो.

मी मुंबईच्या टीममध्ये, याचा मला आनंद

मुंबईच्या संघात निवड झाल्याने पीयुष चावला आनंदी आहे. 32 वर्षीय पीयुष चावलाने मुंबईचा भाग असल्याचं समाधान व्यक्त करत आनंदही व्यक्त केला आहे. नेहमी विजेत्या टीमचा आपण भाग असू, असा प्रयत्न खेळाडू करत असतात. गतविजेच्या आणि सध्या फॉर्मात असणाऱ्या मुंबईच्या टीमचा मला भाग होता आलं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याचं पीयुष म्हणाला.

(Why Mumbai Indians purches Piyush Chawla Rohit Sharma IPL 2021)

हे ही वाचा :

Sachin Tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं कोरोना विरुद्धची मॅच जिंकली, रुग्णालयातून घरी परतला

‘मुंबई इंडियन्सला हरवणं मुश्किल ही नहीं नामुमकीन’, गावस्कर यांच्यानंतर या दिग्गजाची भविष्यवाणी!

IPL 2021 : दिनेश कार्तिक तुफान फॉर्मात, सरावादरम्यान चौकार-षटकारांची बरसात, Video पाहाच…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.