WWC: 'राहुल आवारे'ला कांस्य, जागतिक पदक मिळवणारा पहिला महाराष्ट्रीयन

महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे (Rahul Aware win bronze medal) याने वर्ल्ड चॅम्पियनशीप 2019 मध्ये कांस्यपदकाची कमाई (World Wrestling Championship) केली आहे.

WWC: 'राहुल आवारे'ला कांस्य, जागतिक पदक मिळवणारा पहिला महाराष्ट्रीयन

World Wrestling Championship नूर-सुल्तान (कजाकिस्तान) : महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे (Rahul Aware win bronze medal) याने वर्ल्ड चॅम्पियनशीप 2019 मध्ये कांस्यपदकाची कमाई (World Wrestling Championship) केली आहे.  कजाकिस्तान नूर सुलतान या ठिकाणी सुरु असलेल्या जागतिक कुस्तीची स्पर्धेत राहुल आवारेला कांस्यपदक (Rahul Aware win bronze medal) मिळाले आहे. विशेष म्हणजे राहुल आवारे हा जागतिक पदक मिळवणारा पहिला महाराष्ट्रीय पैलवान ठरला आहे.

61 किलो पुरूष फ्री स्टाईल स्पर्धेत राहुल आवारेचा सामना  अमेरिकेचा कुस्तीपटू टायलर ली ग्राफ याच्यासोबत झाला. महाराष्ट्रातील बीडचा पैलवान असलेल्या राहुलने टाइलर ली ग्राफचा 11-4 च्या फरकाने पराभव केला आणि कांस्यपदकावर (Rahul Aware win bronze medal) नाव कोरले.

यामुळे जागतिक चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. भारताच्या नावे चार कांस्यपदक आणि एका रौप्य पदकाची नोंद आहे. या स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू दीपक पूनिया याला अंतिम सामन्यादरम्यान दुखापत झाली. त्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

कॉमनवेल्थ गेममधील सुवर्ण पदक विजेता राहुलने तुर्केमिनिस्तानच्या करिम होजाकोवला 13-2 च्या फरकाने हरवत विजयी सलामी दिली होती. यानंतर उपांत्यपूर्व स्पर्धेदरम्यान कजाकिस्तानच्या रसुल कालियेचा 10-7 ने पराभव करत अंतिम चार मध्ये स्थान मिळवलं. मात्र काल (21 सप्टेंबर) झालेल्या उपांत्य फेरीत राहुलचा जॉर्जियाच्या बेका लोमात्जेने 6-10 ने पराभव झाला आणि त्यामुळे त्याच्या सुवर्ण पदकावर पाणी सोडावे लागले.

दरम्यान कुस्तीच्या जागतिक स्पर्धेत भारत देश पाच पदकांचा मानकरी ठरला आहे. यात विनेश फोगट ही महिलांच्या 53 किलो वजनी गटात कांस्य पदकाची मानकरी ठरली आहे. त्यानंतर बजरंग पूनिया 65 किलो वजनी गटात, रवि कुमार 57 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले आहे. तर दीपक पूनिया याला रौप्य मिळाले असून राहुल आवारेने 61 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवले आहे.

राहुल आवारेचा अल्पपरिचय (Rahul Aware Information)

राहुल आवारेचा जन्म 2 नोव्हेंबर 1991 मध्ये मराठवाड्यातील बीडच्या पाटोद्या येथे झाला. राहुलचे वडील बाळासाहेब आवारे हे त्या काळाचे अत्यंत नावाजलेले पैलवान होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीचे मैदान गाजवणाऱ्या राहुलला बालपणापासूनच कुस्तीचं बाळकडू मिळालं. त्यांच्या वडीलांची त्यांना सुरुवातीपासूनच तालमीची, व्यायामाची सवय लावली. घरची परिस्थिती हालाखीची असतानाही त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना कुस्तीत पुढे जाण्याचे प्रोत्साहन दिले.

राहुलने लहान वयातच वडीलांकडून कुस्तीचे डावपेच शिकले. वडीलांच्या शिस्तीत आणि मार्गदर्शनाखाली राहुलने लहानपणी जत्रांमध्ये रंगणाऱ्या कुस्तीच्या आखाड्यांमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर भामेश्वर विद्यालयात शिक्षण राहुलने राज्यस्तरीय कुस्ती खेळली. रांचीमध्ये झालेल्या एका स्पर्धेत त्यांनी आपले पहिले सुवर्ण पदक जिंकले.

राहुलचे अकरावी ते एम. ए. पर्यंतचे शिक्षण पाटोदा येथील पीव्हीपी महाविद्यालयात झाले. तेव्हापासून कुस्तीमध्ये कठोर परिश्रम करत राहुलने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक मिळवले आहेत.

सुरुवातीच्या काळात घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे, शेती आणि कुस्ती जिंकून मिळणाऱ्या पैशांमध्ये आवारे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची राहुलची संधी हुकली. पण त्यानंतर त्याने जिद्द न सोडता राहुलने कुस्तीचा सराव सुरु ठेवला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *